केमिस्ट असोसिएशनकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला वॉशिंग मशिन भेट
जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य
ओटवणे प्रतिनिधी
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला वॉशिंग मशीन भेट दिली. यावेळी डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनने उपजिल्हा रुग्णालयाला वॉशिंग मशीन भेट दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे रत्नागिरी - सिंधुदुर्ग सहाय्यक आयुक्त शशिकात यादव, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, सावंतवाडी तालुका अध्यक्ष विनायक दळवी सचिव संतोष राणे, शल्य चिकित्सक डॉ वजराटकर,मुख्य पर्यवेक्षक उबाळे, माजी अध्यक्ष श्रीराम गावडे, अमर गावडे, सतिश बागवे आदी उपस्थित होते.यावेळी आनंद रासम यांनी आरोग्य सेवेतील फार्मासिस्टचे महत्त्व अधोरेखित करत रुग्णालयाला मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. या वॉशिंग मशीनमुळे रुग्णालयाच्या कपडे स्वच्छता कामांना हातभार लागणार असल्याचे सांगितले. तर विनायक दळवी यांनी उपजिल्हा रुग्णालयाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.