For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेकपोस्टची जि. पं. सीईओंकडून पाहणी

10:31 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
चेकपोस्टची जि  पं  सीईओंकडून पाहणी
Advertisement

बेळगाव : रायबाग विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कब्बूर आणि कंकणवाडी येथील चेकपोस्टवर गुरुवारी चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी राहुल शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना वाहनांची योग्यप्रकारे तपासणी करावी, कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होऊ नये, यावर नजर ठेवून राहावे, अशी सूचना केली. त्यानंतर रायबाग शहरातील तहसीलदार कार्यालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेऊन मार्गदर्शन केले. आपल्या व्याप्तीत येणाऱ्या मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधांबाबत माहिती  घेतली. मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची दखल घ्यावी अशी सूचनाही अधिकाऱ्यांना केली. यानंतर महावीर न्यू इंग्लिश स्कूल येथील मास्टरिंग आणि डी मास्टरिंग ठिकाणाची पाहणी केली. यावेळी ता. पं. कार्यकारी अधिकारी बाळाप्पण्णवर, तहसीलदार प्रशांत चन्नगोंड, साहाय्यक निर्देशक अरुण माचकनावर, आयईसी मुत्तूराज गदाडी आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.