सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयुव्ही टाटा पंच लाँच
11 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह उपलब्ध
नवी दिल्ली :
टाटा मोर्ट्सने इलेक्ट्रिक एसयूव्ही टाटा पंच लाँच केली आहे. सुरुवातीची किंमत ही 10.99 लाख रुपयांपासून सुरु राहणार असून टॉपच्या मॉडेलची किंमत ही 14.49 लाख रुपये असणार असल्याची माहिती आहे. नव्या पंच ईव्हीमध्ये 25 केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. यामुळे जवळपास 315 किमी इतके मायलेज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
ईव्ही कोणत्याही 50 केडब्ल्यूएच डीसी फास्ट चार्जरने 56 मिनिटात 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. हे टाटाचे पहिले उत्पादन आहे की जे acti.ev आर्किटेक्चरनुसार तयार केले गेले आहे.
टाटा पंच ईव्हीचे बुकिंग अगोदरच सुरु झाले आहे. 21,000 रुपये टोकन रक्कम भरुन बुकिंग करता येणार आहे. तर याची डिलिव्हरी 22 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहे. ती सिट्रोन इसी 3 सोबत स्पर्धा करणार असल्याची माहिती आहे.