चॅटजीपीटीचे अनोखे टूल
जीवनातील घटनांचा लावू शकते अनुमान
डेन्मार्कच्या संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि लाखो लोकांच्या आकडेवारीच्या मदतीने असे अल्गोरिदम तयार केले आहे, जे लोकांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्याचा अचूक अनुमान व्यक्त करू शकते. याचबरोबर संबंधित व्यक्तीचा मृत्यू कधी होणार याचाही अंदाज लावू शकते. तंत्रज्ञानाची शक्ती आणि त्याच्या धोक्यांबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. परंतु याची सर्वात खास बाब म्हणजे मृत्यूचा अनुमान लावण्याची क्षमता असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
लाइफ2वेक नावाचे हे अल्गोरिदम डीप लर्निंग प्रोग्रामद्वारे लोकांचे आरोग्य आणि सामाजिक जीवनाच्या घटनांचा अनुमान लावू शकणार आहे. मानवी जीवनाचा अनुमान लावण्याचे हे अत्यंत सामान्य स्वरुप आहे असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. यासंबंधीचे अध्ययन नेचर कम्प्युटेशन्ल सायन्स नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
हे टूल आरोग्यसंबंधी अनेक अनुमान व्यक्त करू शकते. म्हणजेच प्रजनन, स्थुलत्व, कर्करोगाची शक्यता यापासून व्यक्ती खूप पैसा कमावू शकेल की नाही याचाही अनुमान व्यक्त करू शकते. हे अल्गोरिदम चॅटजीपीटीप्रमाणेच प्रक्रियेचा वापर करते, परंतु हे जीवनाच्या अनेक पैलू म्हणजेच जन्म, शिक्षण, सामाजिक लाभ आणि वर्क शेड्युल यासारख्या गोष्टींचे विश्लेषण करते.
या प्रोग्रामला लवकरच डेथ कॅल्क्युलेटरचे नाव देण्यात आले आहे. यात काही फ्रॉड वेबसाइट लोकांना स्वत:ची खासगी माहिती देण्याच्या बदल्यात एआयद्वारे राहणीमान उंचाविण्याचे आश्वासन देत आहेत. परंतु सध्या हे सॉफ्टवेअर खासगी असून इंटरनेटवर उपलब्ध नसल्याचे संशोधकांचे सांगणे आहे.
लाइफ2वेक मॉडेलमध्ये डेन्मार्कमधील 60 लाख लोकांची आकडेवारी आहे, ही आकडवारी अधिकृत स्टॅटिस्टिक्स डेन्मार्क एजेन्सीने जमविली आहे. घटनांच्या क्रमाचे अध्ययन करत हे अंतिम श्वासापर्यंतचा पूर्वानुमान व्यक्त करू शकते. मृत्यूचा पुर्वानुमान लावण्यात हे मॉडेल 78 टक्के अचूक ठरले आहे. 35-65 वयोगटातील लोकांचा पूर्वानुमान लावला जातो आणि 2008-16 या 8 वर्षांच्या कालावधीच्या आधारावर पुढील 4 वर्षांमध्ये व्यक्तीसोबत काय घडू शकते हे सांगू शकतो. सध्या हे टूल रिसर्च सेटिंगच्या बाहेर वापरासाठी तयार नसल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.