चॅट जीपीटीच्या इमेज जनरेटरचा जलवा
07:00 AM Mar 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : ओपन एआयने आपल्या सर्वात आधुनिक इमेज जनरेटर टूलचे सादरीकरण करत धमाल उडवून दिली आहे. चॅट जीपीटीवर जीपीटी 4 वर आधारित इमेज जनरेशन हे नवे फिचर सध्याला वापरकर्त्यांना मोहित करताना दिसते आहे. अलीकडेच लाँच झालेल्या या फिचरने उत्कृष्ठ कलात्मक क्षमता सिद्ध केली आहे. ओपन एआयचे हे नवे टूल वेगवेगळ्या कलात्मक शैलींना अगदी आहे त्या प्रमाणे पुनर्स्थापित करण्यामध्ये यशस्वी ठरते. चॅट जीपीटीच्या प्लस, प्रो आणि वापरकर्त्यांनी गिलबी थीम आधारित अॅनिमेशनचा वापर केलेला पहायला मिळाला. स्टुडिओ गिलबी असे नव्या जनरेटरचे नाव ठेवण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement