चॅट जीपीटी सेवा पुन्हा सुरु होणार
मुंबई :
चॅटजीपीटी चार महिन्यापूर्वी जगभरात डाऊन झाले होते. तोपर्यंत नवीन अपडेट स्टुडिओ गिबली इमेज जनरेटर चालू केल्याने ही समस्या झाली होती. परंतु आता चॅटजीपीटीची सेवा पुन्हा सुरु होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स बेस्ड चॅटबॉटची सेवा बुधवारी सकाळी जगभरात डाऊन झाली होती. मात्र ओपन एआयने ही समस्या लवकरच सोडवून सेवा पुन्हा सुरु केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
या जागतिक आउटेजमध्ये ग्राहकांना लॉगिन करण्यासह सोबत एआय टूल्स सोरा, कोडेक्स आणि जीपीटी एपीआय यांना अॅक्सेसस करण्यास समस्या येत होती. आणि स्क्रीनवर अनयुजुअल अॅक्टिव्हिटी डिटेक्टेड असा मॅसेज येत होता. या महिन्याच्या सुरुवातीलाही या सेवेवर परिणाम झाला होता. असे दुसऱ्यांदा झाल्याने सेवेवरील विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाला असल्याचे काहींचे म्हणणे आहे. भारतासह सेवेवर परिणाम उत्तर अमेरिका, युरोप व आशियातील काही प्रांतात बुधवारी जाणवल्याचे समजते.