क्रिस्टोफर नोलनच्या चित्रपटात चार्लीज थेरोन
हॉलिवूड अभिनेत्री चार्लीज थेरोन ही क्रिस्टोफर नोलनच्या आगामी चित्रपटात सामील होणार आहे. या चित्रपटात यापूर्वीच मॅट डेमन, टॉम हॉलंड, ऐनी हॅथवे, जेंडाया, रॉबर्ट पॅटिन्सन आणि लुपिता न्योंगो यासारखे दिग्गज कलाकार सामील आहेत. आता अभिनेत्रीचे नाव देखील याच्यात जोडले गेले आहे. चित्रपटाचे चित्रिकरण नव्या वर्षात सुरू होणार असल्याचे समजते. क्रिस्टोफर नोलन हे ब्रिटिशन आणि अमेरिकन चित्रपट निर्माते आहेत. नोलन यांना हॉलिवूडमध्ये अत्यंत दमदार चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखले जाते. त्यांना 21 व्या शतकातील सर्वोत्तम निर्मात्यांपैकी एक मानले जाते. नोलन यांना आतापर्यंत दोन अकॅडमी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि दोन ब्रिटिश अकॅडमी फिल्म पुरस्कार मिळाले आहेत. तर नोलन यांच्या ‘ओपेनहायमर’ या चित्रपटाने चालू वर्षात 7 ऑस्कर पटकाविले आहेत. अभिनेत्री चार्लीजला ‘हेड इन द क्लाउड्स’, ‘माइटी जो यंग’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. अभिनेत्री नेटफ्लिक्सकरता टैरॉन एगर्टनसोबत सर्वाइवल थ्रिलर अपेक्सचे चित्रिकरण सुरू करणार आहे.