तेलंगणात ‘स्टार’ नेत्यांचा करिष्मा...
तेलंगणात महिना अखेरीस विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असतानाच राजकारण शिगेला पोहोचले आहे. सत्ताधारी भारतीय राष्ट्र समिती (बीआरएस) ते विरोधी काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षही निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. निवडणुका जिंकता याव्यात यासाठी प्रत्येकजण स्वत:ला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तेलंगणाच्या राजकीय क्षेत्रात असे अनेक नेते आहेत जे पाच किंवा त्याहून अधिक वेळा विधानसभा निवडणुका जिंकून आमदार झाले आहेत. यामध्ये काही नावे अशी आहेत ज्यांनी पाच नव्हे तर सात वेळा विजय मिळवला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही नेत्यांबद्दल सांगणार आहोत जे पाच किंवा त्याहून अधिक वेळा आमदार झाले आहेत.
के. चंद्रशेखर राव आठवेळा सभागृहात
सर्वाधिक वेळा विजयी पताका फडकवण्याच्या यादीत सर्वाधिक आठ वेळा विधानसभेवर निवडून आलेले विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे नाव आहे. 1985, 1989, 1994, 1999, 2001 असा त्यांचा कार्यकाळ होता. त्यानंतर 2004, 2014, 2018 मध्येही त्यांनी विजय मिळवला.
जना रेड्डी ,इटेला राजेंदर 7 वेळा आमदार
के. चंद्रशेखर राव यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जना रेड्डी आणि विद्यमान भाजप नेते इटेला राजेंदर यांचा क्रमांक लागतो. दोघेही सात वेळा आमदार निवडून आले आहेत. जना रेड्डी यांनी 1983 आणि 1985 मध्ये टीडीपीच्या तिकिटावर विजय मिळवला होता. यानंतर 1989, 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. इटेला राजेंदर 2004, 2008, 2009, 2010, 2014, 2018 मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीमधून तर 2021 मध्ये भाजपच्या तिकीटावर विजयी होऊन आमदार झाले आहेत.
विजयाचा ‘षटकार’ खेचणारे नेते
याशिवाय सहावेळा विधानसभेवर निवडून आलेले अनेक नेते आहेत. या नेत्यांमध्ये जी. गडेना, टी जीवन रेड्डी , कोप्पुला ईश्वर, पोचाराम श्रीनिवास रेड्डी , सी. राजेश्वर राव, टी. हरीश राव, डॉ. एम. चेन्ना रेड्डी , मुन्थाज अहमद खान, नारा आणि राघव रेड्डी यांच्या नावांचा समावेश आहे.
पाचवेळा आमदार झालेले नेते
पाचवेळा विधानसभेत आमदार म्हणून निवडून आलेल्या नेत्यांमध्ये जे राजाराम, गम्पा गोवर्धन, मांडवा व्यंकटेश्वर, करणम रामचंद्र राव, सी वायटल रेड्डी , के हरिश्वर रेड्डी , पी जनार्दन रेड्डी , तलासनी श्रीनिवास यादव, दानम नागेंद्र, अकबऊद्दीन ओवैसी, सलाहुद्दीन ओवैसी यांचा समावेश आहे. अमानुल्ला खान, जी सायना, डॉ. पी शंकर राव, गुरनुथा रेड्डी , जे कृष्णा राव, एन उत्तम कुमार रेड्डी पी गोवर्धन रेड्डी आणि कोंडा लक्ष्मण बापूजी यांची नावेही पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्यांमध्ये समाविष्ट आहेत.