महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवादी अर्श डल्लाविरोधात आरोपपत्र

06:55 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एनआयएने उचलले पाऊल : दहशतवादी-गँगस्टर सिंडिकेटवर वार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पंजाब आणि दिल्लीच्या विविध भागात दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याप्रकरणी कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंह आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अर्श डल्लाकडून संचालित होणारे स्लीपर सेल नष्ट करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. कॅनडात लपून बसलेला अर्शदीप सिंह उर्फ डल्ला आणि त्याचे भारतीय हस्तक हरजीत सिंह उर्फ हॅरी मौर, रविंदर सिंह उर्फ राजविंदर सिंह उर्फ हॅरी राजपुरा आणि राजीव कुमार यांच्याविरोधात एनआयएने नवी दिल्लीतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपी मौर आणि राजपुरा हे स्लीपर सेलच्या स्वरुपात काम करत होते आणि त्यांना राजीव कुमारकडून आश्रय पुरविला जात होता. तिन्ही आरोपींनी डल्लाच्या निर्देशावर आणि त्याच्याकडून प्राप्त रकमेद्वारे अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट रचला होता. मौर आणि राजपुरा हे टोळीचे शूटर होते आणि त्यांना टार्गेट किलिंगचे काम सोपविण्यात आले होते. तर राजीव कुमारला हॅरी मौर आणि हैरी राजपुराला आश्रय देण्यासाठी अर्श डल्लाकडून पैसे मिळत होते. तपास यंत्रणेने 23 नोव्हेंबर 2023 रोजी मौर, राजपुराला अटक केली होती. तर 12 जानेवारीला राजीव कुमारला अटक करण्यात आली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article