For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शस्त्रास्त्र तस्कर मलकित सिंगविरोधात आरोपपत्र

06:14 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
शस्त्रास्त्र तस्कर मलकित सिंगविरोधात आरोपपत्र
Advertisement

ड्रोनद्वारे सीमेपलीकडून तस्करीचा पर्दाफाश

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सीमापार शस्त्रास्त्र तस्करीप्रकरणी मलकित सिंगविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात तो पाकिस्तानस्थित अमली पदार्थ तस्कर रहमत अली उर्फ मियाँ, पाकिस्तानस्थित आयएसवायएफ प्रमुख लखबीर सिंग रोडे उर्फ बाबाजी आणि रणज्योतसिंग राणा यांच्या थेट संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे आणि दाऊगोळ्याची सीमापार तस्करी केल्याप्रकरणी पंजाबमधील मोहाली येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात एजन्सीने मलकित सिंगविऊद्ध आरोपपत्र दाखल केल्याचे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले. एनआयएच्या तपासात बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य आणि पाकिस्तानमधील व्यक्ती यांच्यातील संबंध उघड झाले आहेत. या दहशतवादी नेटवर्कमधील आरोपींमध्ये मलकित सिंग, तरनजोत सिंग उर्फ तन्ना आणि गुरजीत सिंग उर्फ पा यांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले. संबंधितांवर सशस्त्र हल्ले करणे, धमकी देणे, खून करणे, खंडणी वसूल करणे, दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करणे आणि सामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement
Tags :

.