कोरटकर वरील दाखल गुन्ह्यात पुरावा नष्ट केल्याचा एक कलम वाढवा
शिवप्रेमींची मागणी
कोरटकरने पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न
कोल्हापूर :
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील एक पोलिसांच पथक कोरटकरचा शोध घेण्यासाठी नागपूरकडे रवाना झालाय मात्र प्रशांत कोरटकर सध्या फरार आहे.
प्रशांत कोरटकर ने तपासासाठी आपला मोबाईल पोलिसांकडे सुपूर्द केला असला तरी त्याने मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला असल्याने तपासात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे प्रशांत कोरटकरने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याच युक्तीवाद देखील न्यायालयात झाला होता. यामुळे आता कोरटकर वर दाखल असलेल्या गुन्ह्यात आणखी पुरावा नष्ट केल्याचा एक कलम वाढवावा यासाठी आज फिर्यादी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत आणि शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.