For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाविकांच्या गर्दीत चारधाम यात्रेला प्रारंभ

06:22 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाविकांच्या गर्दीत चारधाम यात्रेला प्रारंभ
Advertisement

केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्रीचे दरवाजे उघडले : मुख्यमंत्र्यांकडूनही दर्शन

Advertisement

वृत्तसंस्था/ देहराडून

अक्षय्य तृतीयेच्या पवित्र सणादिवशी शुक्रवारी केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रेला सुऊवात झाली. सर्वप्रथम सकाळी सात वाजता देश-विदेशातील भाविकांसाठी केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले. यानंतर यमुनोत्री आणि गंगोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले. केदारनाथचे दरवाजे उघडण्याच्या वेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामीही उपस्थित होते.

Advertisement

जगप्रसिद्ध गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडल्याने चारधाम यात्रेचे औपचारिक उद्घाटन झाले आहे. शुक्रवारी अक्षय्य तृतीयेच्या पवित्र सणानिमित्त गंगोत्री धाम आणि यमुनोत्री धामचे दरवाजे विधीवत हवन, पूजा, वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनी उघडण्यात आले. गंगोत्रीचे दरवाजे दुपारी 12.25 वाजता आणि यमुनोत्रीचे दरवाजे सकाळी 10.29 वाजता उघडण्यात आले. सुमारे पाच हजार यात्रेकरू गंगोत्री धाम येथे तर सुमारे सहा हजार भाविक यमुनोत्री धाम येथे दर्शनासाठी आले होते. शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासूनच मंदिर परिसर व दर्शन रांगेत भाविकांच्या आगमनाची प्रक्रिया सुरू झाली होती. केदारनाथबरोबरच गंगोत्रीचे श्री कपट आणि यमुनोत्री धाम या तिन्ही धामांची भव्य सजावट करण्यात आली आहे.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता शनिदेव महाराजांच्या नेतृत्वाखाली यमुना मातेची मिरवणूक हिवाळी मुक्काम खरसाळी येथून यमुनोत्रीकडे रवाना झाली. यमुना डोली यात्रा सुमारे दहा वाजता यमुनोत्री धाम येथे पोहोचली. जिथे सकाळी 10.29 वाजता यमुनोत्री धामचे दरवाजे वैदिक मंत्रोच्चार व विधी पूजनाने भाविकांसाठी उघडण्यात आले. आता येथे सहा महिने रोज पूजा केली जाणार आहे. यावेळी मठपती रामप्रसाद मैठानी, व्यवस्थापक बलवीरसिंग नेगी, अतुल मैठानी यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

उत्तरकाशीतून वाहतूक नियोजन

उत्तरकाशीतील पोलिसांनी चारधाम यात्रेच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी वाहतूक आराखडा तयार केला आहे. शुक्रवारपासून ही योजना सुरू झाली आहे. ऋषिकेशहून गंगोत्री धामला येणाऱ्या भाविकांसाठी नरेंद्रनगर, चंबा, धरसू बंद, उत्तरकाशी, गंगोरी, भटवाडी, हरसिल, गंगोत्री असा मार्ग असल्याचे वाहतूक निरीक्षक राजेंद्र नाथ यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.