For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चर्मकार समाज उन्नती मंडळ समाजासाठी उल्लेखनीय उपक्रम राबवतय !

05:28 PM Dec 19, 2023 IST | अनुजा कुडतरकर
चर्मकार समाज उन्नती मंडळ समाजासाठी उल्लेखनीय उपक्रम राबवतय
Advertisement

पो. निरीक्षक रूणाल मुल्ला यांचे प्रतिपादन ; कुडाळात चर्मकार समाज गौरव सोहळा संपन्न

Advertisement

कुडाळ / वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्हा संस्कृतीची ओळख जपणारा जिल्हा आहे.आजची तरुण पिढी येथील दशावतार लोककला तसेच पुरातन कला जोपासून वाटचाल करीत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ हे समाजासाठी अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवित आहे.हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कुडाळच्या पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी चर्मकार समाजाच्या गौरव सोहळा कार्यक्रमात कुडाळ येथे केले.

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ (सिंधुदुर्ग ) च्या कुडाळ तालुका शाखेच्यावतीने सन २०२४ ची दिनदर्शिका प्रकाशन तसेच यशस्वी उद्योजक व नामवंत युवा कलाकार यांचा सत्कार सोहळा येथील मराठा समाज सभागृहात या मंडळाचे कुडाळ तालुका अध्यक्ष
मनोहर सरमळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता उ‌द्घाटन पोलिस निरीक्षक श्रीमती मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव, माजी गटविकास अधिकारी तथा जेष्ठ रंगकर्मी विजय चव्हाण, सिंधुदुर्ग पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर आंबेकर, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर ,जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे ,प्रवक्ते के टी चव्हाण, उद्योजक रामदास चव्हाण, सुभाष बांबुळकर , पांग्रड सरपंच कावेरी चव्हाण ,श्रीराम चव्हाण
सुरेश पवार ,राजन वालावलकर रत्नदीप चव्हाण, मधुकर चव्हाण, संतोष चव्हाण, सोनाली चव्हाण,गणपत चव्हाण, प्रा नितीन बाबर्डेकर, महानंद चव्हाण, सोनाली चव्हाण ,केशव चव्हाण तसेच समाजबांधव व आजी-माजी पदाधिकारी - सदस्य उपस्थित होते.
श्रीमती मुल्ला म्हणाल्या, त्यावेळची समाज परिस्थिती व आताची परिस्थिती पाहता ज्यांच्यामुळे आपण घडत आहोत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील संस्कृती ही विविध लोककला जोपासणारी आहे हे विशेष आहे, असे सांगितले. मनोहर सरमळकर यांनी सामाजिक, शैक्षणिक व अन्य उपक्रमांचा आढावा घेताना यापुढेही संघटीतपणे समाजाच्या विकासाची कास धरुया, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

विजय चव्हाण यांनी कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना जिद्द, चिकाटी ,मेहनत आणि आत्मविश्वास सोबत बाळगा यश निश्चितच आहे आपल्या जिल्हाची सांस्कृतिक चळवळ अधिक जोमाने वृध्दिंगत झाली पाहिजे.  यासाठी आपण करणार असल्याचे सांगितले. श्री आंबेकर, श्री पाताडे, श्री ओटवणेकर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. दशावतार कलाकार, उद्योजक यांचा शाल श्रीफळ मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. दिनदर्शिका अहवाल वाचन श्रीराम चव्हाण व रत्नदीप चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन प्रा. नितीन बाबर्डेकर यांनी,तर आभार मधूकर चव्हाण यांनी मानले.

Advertisement
Tags :

.