For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसामुळे चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित

06:45 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
पावसामुळे चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित
Advertisement

छत्तीसगडमध्ये वीज पडून 5 जणांचा मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, देहराडून

Advertisement

देशभरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. पावसामुळे यात्रामार्गात येणाऱ्या अडथळ्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंडसोबतच अन्य राज्यांमध्ये पावसाचे सत्र सुरू आहे. चंपावत, बागेश्वर आणि टिहरी येथे इयत्ता बारावीपर्यंतच्या शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. राजस्थानच्या धोलपूरमध्ये मुसळधार पावसामुळे बाजारपेठांमध्ये पाणी साचले. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे टाटा मोटर्सचा सानंद येथील प्रकल्प आणि जवळपासचे अनेक पुरवठादार युनिट्स बंद करावे लागले.

छत्तीसगडमध्ये वीज पडून तीन ठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाला आणि 11 जण जखमी झाले. राज्यात पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशभरात सध्या हवामानाच्या दोन प्रणाली कार्यरत आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडमधून पुढे सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवसांत वायव्य आणि मध्य भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस आणि पूर्व भारतात मुसळधार पावसाचा इशारा दि

Advertisement
Tags :

.