For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काणकोणातील चापोली धरणाचा जलाशय ‘ओव्हरफ्लो’

12:41 PM Jul 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
काणकोणातील चापोली धरणाचा जलाशय ‘ओव्हरफ्लो’
Advertisement

काणकोण : काणकोण तालुक्यात 20 रोजी साडेतीन इंच इतक्या पावसाची नोंद होऊन काणकोणची जीवनवाहिनी असलेल्या चापोली धरणाचा जलाशय तुडुंब भरून वाहू लागला आहे. सध्या जलाशयातील पाण्याची पातळी 7 मीटर इतकी वाढली असल्याची माहिती जलस्त्रोत खात्याचे अभियंता किशोर पवार यांनी दिली. काणकोण तालुक्यात 75 इंच इतक्या पावसाची नोंद झालेली असून आतापर्यंत अत्यंत समाधानकारक असा पाऊस या ठिकाणी पडला आहे. मागच्या वर्षी 15 जुलै रोजी या धरणाचा जलाशय ओव्हरफ्लो झाला होता, तर त्याआधी 2023 साली 28 जुलै, 2022 साली 19 जुलै आणि 2021 साली 23 जुलै रोजी जलाशय तुडुंब भरून वाहू लागला होता. काणकोण तालुक्यातील गालजीबाग, तळपण या नद्या देखील दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.