Mungi Ghat Kavadi Yatra | मुसळधार पावसात 'महाद्या धाव'चा जयघोष! शिखर शिंगणापूरचा थरारक मुंगी घाट सोहळा संपन्न
सासवडच्या 'तेल्या भुत्या'च्या कावडीचा मुंगी घाटात थरार
नातेपुते - सकाळपासून रखरखणारेऊन होते. कावड मुंगी घाटाची बडण सुरू करताच मुसळधार पाऊस सुरू झाला. मोठ्या भक्तिभावात महाद्या धाव- महाद्या धाव अशी आर्त हाक देत अतिशय कठीण असणारा मुंगी घाट कावडी चढत होत्या, अतिशय उत्साही अन तारोमहर्षक वातावरणात मुंगी घाटातून कावडी चढविण्याचा सोहळा सोमवारी लाखो भाविकांच्या साक्षीने या पार पडला.
सासवड (जि. पुणे) येथील श्री. संत भुतोजी बुवा तेली ऊर्फ तेल्या भुत्याधी कावड व इतर शेकडो मानाच्या कावडी उराज कोथळे (ता. माळशिरस) येथील अतिशय कठीण व लहान असणाऱ्या मुंगी घाटातून मानवी साखळी करून रात्री ७ वाजता शिखर शिंगणापूला पोबल्या. यावेळी हजारो भाविक स्वागतास उभे होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत व छत्रपती शिवरायांचे कुलदैवत असणाऱ्या शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची वार्षिक यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र शुद्ध पाडव्या पासून सुरू आहे. चैत्र शुद्ध द्वादशी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. महाराष्ट्रातून आलेल्या हजारो कावडीने जलाभिषेक करून शंभू महादेवाचे दर्शन
घेतले. तेल्या भुत्याव्या कावडीचे दुपारी कोथळे येथे आगमन झाले. मानाच्या तेल्या मुत्याच्या कावडीची पहिली आरती ४.३० वाजता झाली. यावेळी आंदरुड, गुणावरे (ता. फलटण) येथील वाटाड्याची मानाची कावड सोबत होती. सायं. ५.४५ वा. कावडीची आरती होऊन कावड घाट चढण्यास सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली.
यावेळी हर हर महादेव, महाद्या धाव महाद्या धाव अशा घोषणा दरी कपारीतून घुमत होत्या. सासवड परिसरातील लोकांच्या बरोबरीनेच कन्हेर (ता. माळशिरस) येथील शेकडो तरुण कावडीला घाट चढण्यासाठी मदत करत होते. अवघड टप्पे पार करीत असताना खालून भाविक टाळ्या वाजवून पोषणा देत कावडी धारकांना प्रोत्साहन देत होते. इतर कावडी दुपारपासून मुंगी घाटातून मार्गस्थ होते
यावेळी तगड्या पोलिस बंदोबस्तासह मांडवे, मोरोची, फोंडशिरस, माळीनगर, शंकरनगर, माणकी, पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.