महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय थायरॉईडचा धोका

12:28 PM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सकस आहाराच्या कमतरतेमुळे विविध आजारांना निमंत्रण, स्त्रीरोग तज्ञ अनिशा सावंत यांनी दिली सविस्तर माहिती 

Advertisement

पणजी : सकस आहाराची कमतरता व धावपळीची जीवनशैली यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळते. विशेष म्हणजे, महिलांमध्ये थायरॉईड आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे सध्या दिसून येत आहे. याविषयी स्त्राrरोग तज्ञ अनिशा सावंत यांनी ‘दै. तऊण भारत’ प्रतिनिधीला सविस्तर माहिती दिली. थायरॉईड ग्रंथी आपल्या घशाच्या भागात असतात आणि त्या खूप लहान असतात. पण आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी व अनेक आजारांपासून संरक्षण करण्यात त्या महत्त्वाची भूमिका बजावितात. थायरॉईड ग्रंथीदेखील आपली चयापचय प्रणाली योग्य राखण्यात मोठी भूमिका बजावतात. जर या ग्रंथी खूप काम करत असतील किंवा खूप मंदगतीने काम करीत असतील तर दोन्ही स्थितीत त्याचा शरीरावर दुष्पपरिणाम होतो. हेच कारण आहे की, जेव्हा थायरॉईडची समस्या उद्भवते, तेव्हा एक लक्षण नाही तर शरीरात अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात. त्याचप्रमाणे थायरॉईडचे विकार आणि डिप्रेशन, चिंता अशा मानसिक विकारांची लक्षणे आढळण्याची शक्यता जास्त असते.

Advertisement

त्यामुळे हायपोथायरॉईडीझममध्ये डिप्रेशनचे प्रमाण जास्त आढळते. थायरॉईड आजार दहापैकी पाचजणांमध्ये हमखास होतो. बदलत्या जीवनशैलीमुळेही हा आजार बळावतो. विशेषत: महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण पुऊषांपेक्षा अधिक आहे. पुऊषांच्या तुलनेत महिला या अधिक धावपळ करतात. त्यांच्याकडे कामाच्याही जबाबदाऱ्या अधिक असतात. मासिक पाळी, गर्भावस्था या सगळ्यामुळे त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळेच महिलांमध्ये या विकाराचे प्रमाण अधिक असते. थायरॉईड दोन प्रकारचा असतो. एकात बाधित व्यक्तीचे वजन वाढते आणि दुसऱ्या प्रकारात वजन कमी होते.थायरॉईड हा वयाच्या तिशीनंतर विशेषत: महिलांमध्ये आढळून येणारा आजार आहे मात्र अलीकडे कमी वयातसुद्धा तसेच मुलींमध्येदेखील हा आजार आढळतो.

परिणामी वैद्यकीय यंत्रणा सध्या अलर्ट झाली असून, धावपळीच्या युगामध्ये महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. महिलांनी नियमित योगासने व व्यायाम करणे आवश्यक आहे. सकस व पौष्टिक आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या व फळांचा समावेश करणे गरजेचे आहे. राज्यात थायरॉईडग्रस्त ऊग्णांना सरकारी तसेच खासगी ऊग्णालयात परिपूर्ण औषधोपचार पुरविला जातो. तसेच पहिल्या टप्प्यात तपासणी, रक्तचाचणी व त्यानंतरच विविध उपयुक्त आहार घ्यावा. हार्मोन्समध्ये बदल व धावपळीचे जीवन यामुळे आता मुलींनाही थायरॉईड आजाराचा धोका आहे. इ.दहावीनंतर काही मुलींमध्येसुद्धा थायरॉईडचे प्रमाण दिसून येत आहे. दरम्यान, थायरॉईड ही मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथी आहे. या सर्व प्रक्रियेदरम्यान ट्रायओडोथायरॉनाईन (टी-3) आणि थायरॉक्सिन (टी-4) हे दोन प्रकारचे हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स विशिष्ट शारीरिक प्रक्रियेसाठी आवश्यक असतात. सुप्त थायरॉईड व जागृत थायरॉईड हे दोन प्रकार आहेत, अशी माहिती सावंत यांनी दिली आहे.

थायरॉईडची लक्षणे

थायरॉईड होण्याची प्रमुख कारणे

महत्त्वाचे उपचार

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article