For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निर्देशांकात होतोय बदल, पेटीएमसह 3 जणांचा होणार प्रवेश

06:33 AM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
निर्देशांकात होतोय बदल  पेटीएमसह 3 जणांचा होणार प्रवेश
Advertisement

बीएसई 100, बीएसई सेन्सेक्स 50, बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट 50 मध्ये बदल

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

शेअरबाजारातील निर्देशांकात वेळोवेळी बदल होत असतो. याअनुषंगाने पाहता येणाऱ्या काळात तीन निर्देशांकात बदल होणार आहे. पेटीएमसह 3 कंपन्यांचा समावेश निर्देशांकात होणार आहे.

Advertisement

बीएसई सर्व्हिसेस बेंचमार्क निर्देशांकात बदलाची घोषणा करण्यात आली आहे. हे बदल 22 जून 2026 पासून लागू होतील. बदल झालेल्या निर्देशांकात बीएसई-100, बीएसई सेन्सेक्स-50 आणि बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट-50 यांचा समावेश असणार आहे.

कोण कोणाची जागा घेणार

सोमवार 22 जूनपासून बदल प्रत्यक्षात दिसू शकणार आहे. बीएसई100 मध्ये अशोक लेलँड, वन97 कम्युनिकेशन्स अर्थात पेटीएम व सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स यांचा समावेश होणार आहे. या कंपन्या अंबुजा सिमेंटस, ट्युब इन्वेस्टमेंटस ऑफ इंडिया व कोलगेट पामोलीव्ह इंडिया यांची जागा घेणार आहेत.

टीव्हीएसची एंट्री

तर दुसरीकडे बीएसई सेन्सेक्स-50 मध्ये फेरबदल होणार असून टीव्हीएस मोटर कंपनी निर्देशांकात सामील होणार आहे. तर अदानी एंटरप्रायझेस या निर्देशांकातून बाहेर पडणार आहे. या निर्देशांकात जागा बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये अशोक लेलँड, वन 97 कम्युनिकेशन्स व सीजी पॉवर यांचा समावेश असेल. सेक्टोरल इंडेक्सचा विचार करता एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसला बीएसई फोकसड् आयटी निर्देशांकात सामील करण्यात येत आहे. सायंटची ही कंपनी जागा घेईल.

Advertisement
Tags :

.