For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सीआयएसएफच्या गणवेशात बदल

06:35 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सीआयएसएफच्या गणवेशात बदल
Advertisement

दिवाळीपासून नव्या गणवेशाचा वापर सुरू : 2 लाखांहून अधिक जवानांना 26 जानेवारीपर्यंत नवा गणवेश

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांचा गणवेश तब्बल 20 वर्षांनंतर बदलण्यात येत आहे. विमानतळ, मेट्रो, संसद आणि देशातील महत्त्वाच्या सुरक्षा आस्थापनांवर तैनात असलेले जवान आता आधुनिक डिजिटल पॅमुफ्लाज पॅटर्नच्या नव्या कॉम्बॅट ड्रेसमध्ये दिसणार आहेत. दिवाळीपासून नव्या गणवेशाचा वापर सुरू होणार असून, पुढील वषी 26 जानेवारीपर्यंत दोन लाखांहून अधिक जवान आणि अधिकाऱ्यांना हा गणवेश उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सीआयएसएफचे महासंचालक प्रवीर रंजन यांच्या संकल्पनेतून हा बदल करण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या धर्तीवर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या कॉम्बॅट गणवेशात आधुनिक बदल केले जात आहेत. यापूर्वी सीआरपीएफ आणि बीएसएफनेही त्यांच्या जुन्या गणवेशाच्या जागी नवा गणवेश स्वीकारला आहे.

Advertisement

विमानतळापासून संवेदनशील भागांपर्यंत एकच गणवेश

सीआयएसएफचे जवान नियमित सुरक्षा तैनातीबरोबरच जम्मू-काश्मीर, मणिपूर आणि छत्तीसगडसारख्या संवेदनशील भागांमध्येही गरजेनुसार तैनात केले जातात. अशा ठिकाणीही ते नव्या कॉम्बॅट वर्दीत दिसणार आहेत. नव्या गणवेशासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी मिळाली असून, त्याच्या निर्मितीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जात आहे. काही जवान आणि अधिकारी नव्या गणवेशात दिसू लागले असून, दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर सुरू होईल.

कॉम्बॅट ड्रेस म्हणजे काय?

कॉम्बॅट वर्दी म्हणजे युद्ध, सुरक्षा मोहिमा किंवा प्रत्यक्ष क्षेत्रातील तैनातीदरम्यान वापरला जाणारा विशेष गणवेश. परिसरातील रंगांशी साधर्म्य असलेल्या कापडामुळे जवानांना सहज ओळखणे कठीण होते. तसेच, आवश्यक उपकरणे ठेवण्यासाठी अधिक खिसे आणि प्रतिकूल हवामानात वापरण्यासाठी टिकाऊ कापड ही त्याची वैशिष्ट्यो आहेत. सीआयएसएफच्या नव्या गणवेशामुळे जवानांच्या कामातील आराम, हालचालींची सुलभता आणि क्षेत्रातील सुरक्षा यांना अधिक महत्त्व मिळणार आहे.

नव्या गणवेशाची वैशिष्ट्यो

?डिजिटल पॅमुफ्लाज पॅटर्न : नव्या गणवेशात मोठ्या ठिपक्मयांऐवजी छोटे पिक्सेलसदृश नमुने आहेत. त्यामुळे दूरून पाहताना जवानांचे शरीर परिसरात मिसळण्यास मदत होते.

?रंगसंगती : ऑलिव्ह ग्रीन, खाकी ग्रीन, तपकिरी आणि काळसर रंगछटांचा वापर करण्यात आला आहे.

?आरामदायी कापड : गणवेशात प्रामुख्याने सुती कापड वापरण्यात आले आहे. घाम लवकर सुकण्यास मदत होईल, अशी त्याची रचना आहे.

?सुरक्षेला प्राधान्य : जुन्या गणवेशाच्या तुलनेत नव्या डिजिटल पॅटर्नची नक्कल करणे अधिक कठीण असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. सीसीटीव्ही पॅमेरे आणि ड्रोनच्या नजरेतूनही जवान सहज ओळखले जाऊ नयेत, यासाठी हा पॅटर्न उपयुक्त ठरणार आहे.

?उपयुक्त रचना : छातीवर बटण असलेले दोन खिसे, खांद्यावर पद दर्शविण्यासाठी फ्लॅप, कार्गो पँटला बाजूचे खिसे आणि बाह्या दुमडून बटणाने घट्ट करण्याची सुविधा असेल.

?विशेष टोपी : गणवेशाच्या रंगसंगतीशी जुळणारी बेसबॉल पॅप आणि त्यावर सीआयएसएफचा लोगो असेल.

Advertisement
Tags :

.