Pandharpur l पंढरपुरात खग्रास चंद्रग्रहणानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी पूजाविधीत बदल
चंद्रग्रहण स्पर्शानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणींचे स्नान विधी
पंढरपूर: खग्रास चंद्रग्रहण ३ मार्च रोजी असल्याने श्री विठ्ठल व श्री राक्मिणी माता यांच्या नित्योपचार व पूजाविधीच्या वेळेत शास्त्रोक्त नियमानुसार आवश्यक बदल करण्यात येत आहेत, पंचांगानुसार ग्रहणाचा स्पर्श सायंकाळी ६.३४ वाजता असून मोन सार्यकाळी ६.४८ वाजता आहे पंढरपूर येथे सूर्यास्त सायंकाळी ६.३४ वाजता होत असल्याने सायंकाळी ६.३४ ते ६.४८ (एकूण १४ मिनिटे) या कालावधीत ग्रहण नियम पाळण्यात येणार आहेत.
ग्रहण काळातील प्रमुख ववत पुढीलप्रमाणे असून यामध्ये काकड आरती व नित्यपूजा पहाटे ४.०० ते ५.५५ वाजता नेहमीप्रमाणे महानैवेद्य सकाळी १०.४५ ते ११.०० वाजता महानैवेद्यामध्ये नेहमीचा नैवेद्य याश्नविण्यात येणार नाही त्याऐवजी सुका मेवा नैवेद्य दाखविण्यात येईल. पोशाख/दुपारचा नैवेद्य (४.२० ते ५.०० वाजता) ग्रहणाचा वेध सुरू होणार असल्याने लाडूचा नैवेद्य दाखविण्यात येणार नाही त्याऐवजी सुका मेवा चाबविण्यात येईल.
ग्रहण स्पर्शानंतर (सायंकाळी ६.३४ वाजता) श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी माता तरीच मंदिरातील मंदिराबाहेरील सर्व परिवार देवतांना चंद्रभागा नदी (भीमा) नदीचे पाणी आणून स्नान घालण्यात येईल ग्रडण मोक्षानंतर (सायंकाळी ६.४८ वाजता) सर्व देवतांना पुनःस्नान घालून शुद्धीकरण विची पूर्ण करण्यात येईल. धुपारती रात्री ९.३० वाजता, शेजारती रात्री १२.०० वाजेनंतर नेहमीप्रमाणे होईल. खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्रीच्या नित्योपचारात वरीलप्रमाणे बदल करण्यात येत असून, भाविकांनी वर्शन व पूजाविधीच्या वेळेत याची नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.