कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजपासून युपीआय नियमांमध्ये बदल

06:42 AM Feb 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आता युपीआय व्यवहारांसाठी आवश्यक सेटिंग्स करावे लागणार 

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

ई रिक्षापासून मेट्रो ट्रेनपर्यंत ते भाजीपाला दुकानांपर्यंत, युपीआय पेमेंट आता सर्वांसाठी आघाडीचा पर्याय ठरला आहे. डिजिटल व्यवहार सोपे आणि सुरक्षित करण्यासाठी युपीआयने नियामांमध्ये मोठे बदल केले आहेत. 1 फेब्रुवारी 2025(आजपासून) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) युपीआय आयडीमध्ये विशेष अक्षर वापरल्यास व्यवहार ब्लॉक करणार आहे.

एनपीसीआयने एक परिपत्रक जाहीर करुन या संदर्भात माहिती दिली आहे, की 1 फेब्रुवारीपासून विशेष अक्षरांनी बनवलेल्या आयडीसह व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. कारण यामध्ये वापरकर्ते फक्त अल्फान्यूमेरिक अक्षरांनी तयार केलेला आयडीच ग्राह्या धरला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

विशेष अक्षरांसह आयडी आणि अल्फान्यूमेरिक यातील फरक ?

यामध्ये कोणतेही युपीआय अॅप वापरत असल्यास जे व्यवहार आयडीमध्ये विशेष अक्षर उदा : @, #, $, ! इत्यादी वापरतात, तर व्यवहार केंद्रीय प्रणालीद्वारे हा आयडी नाकारला जाण्याची शक्यता आहे. यावर एनपीसीआय यांनी युपीआय व्यवहार आयडी जनरेशन प्रक्रियेचे प्रमाणीकरण केले आहे. यामुळे सर्व पेमेंट इकोसिस्टम प्लेयर्सना फक्त अल्फान्यूमेरिक अक्षर वापरण्याचे आवाहन केले आहे.

उदारहण : विशेष आयडी : ValiID-upi@2345!6789 0#ab$cd

अल्फान्यूमेरिक आयडी : wali id- upi1234cbdc67899

वरील उदारहणात : पहिल्या आयडीमध्ये  @,#, आहे, यात विशेष अक्षर नसल्याने हा आयडी अवैध मानला जातो. तर दुसरा व्यवहार आयडी हा वैध मानला आहे. कारण त्यामध्ये फक्त अक्षरे आणि संख्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article