For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मायदेशातील टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल

06:35 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
मायदेशातील टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल
Advertisement

बीसीसीआयची माहिती : द.आफ्रिका, वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या सामन्यांच्या ठिकाणात बदल : महिला संघाचेही सामने हलवले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी मायदेशात 2025 वर्षात होणाऱ्या सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. अनेक सामन्यांची ठिकाणेही बदलण्यात आली आहेत. यात आंतरराष्ट्रीय मालिका आणि दक्षिण आफ्रिका अ संघाच्या द्रौयाचाही समावेश आहे. याशिवाय, भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यातील सामन्यांची ठिकाणे देखील बदलण्यात आली आहेत. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या काही कामांमुळे, भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यातील एकदिवसीय मालिकेची ठिकाणे देखील बदलण्यात आली आहेत.

Advertisement

नवीन वेळापत्रक जाहीर करताना बीसीसीआयने म्हटले आहे की, 2 ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आता कोलकाताऐवजी दिल्लीत होईल. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, जो आता दिल्लीऐवजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल.

राजकोटमध्ये भारत अ संघाचे सामने खेळवले जाणार

भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघ 30 ऑक्टोबरपासून दोन चारदिवसीय आणि तीन वनडे सामने खेळतील. चारदिवसीय सामने बेंगळूरमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे होतील. पूर्वी बंगळूरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणारे 3 एकदिवसीय सामने आता राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये हलवण्यात आले आहेत.

महिला संघाच्या सामन्यातही बदल

या हंगामात भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका खेळायची आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममधील आऊटफिल्ड आणि खेळपट्टी यांच्या नूतनीकरणाच्या कामांमुळे भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील सामने चेन्नईतून हलवण्यात आले आहेत. आता पहिले दोन सामने नवी चंदिगडला होतील, तर शेवटचा वनडे सामना नवी दिल्लीत होईल.

Advertisement
Tags :

.