महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आज दक्षिणेत रस्ता वाहतुकीत बदल

11:03 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : बेतूल येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आज 6 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खालील रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रित  करण्यात येणार आहे. नावेली जंक्शन ते बाळ्ळी जंक्शन, चिंचोणे जंक्शन ते ओएनजीसी बेतूल, बाळ्ळी  जंक्शन ते ओएनजीसी बेतूल, केळशी ते असोळणा पूलमार्गे ओएनजीसी बेतूल, त्याचप्रमाणे मोबोर ओडलीहून असोळणा-चिंचोणेकडे जाणारी वाहतूक नियंत्रित करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे. त्याचप्रमाणे खालील रस्त्याच्या बाजूला कोणत्याही प्रकारची वाहने पार्क करता येणार नसल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  चिंचोणे जंक्शन ते ओएनजीसी बेतूल ( असोळणे मार्केट मार्गे), बाळ्ळी जंक्शन-बोमडामळ- दाबे, -किटोल ते  ओएनजीसी बेतूल, कदंब  बसस्थानक कुंकळी ते भाजप कार्यालय कुंकळ्ळी या रस्त्याच्या  दुतर्फा कोणतेही वाहन पार्क करता येणार नसल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी

Advertisement

दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग-

पणजीच्या बाजूने (उत्तर)- आगशी-जुवारी पूल कुठ्ठाळी जंक्शन, 366 राष्ट्रीय महामार्ग सेंट, जासिंतो बेट, चिखली जंक्शन, विमानतळ जंक्शन, विमानतळ.

मडगाव/फोंडा बाजूने (दक्षिण)- इस्टर्न बायपास, आर्लेम सर्कल, राज्य महामार्ग 5, राय-बोरी टोल नाका-रासई-ठाणे कुठ्ठाळी-कुठ्ठाळी जंक्शन-366 राष्ट्रीय महामार्ग- सेंट  जासिंतो बेट- चिखली जंक्शन- विमानतळ जंक्शन- विमानतळ.

कोलवाहून पणजीच्या दिशेने जाण्यासाठी

कोलवाहून पणजीच्या दिशेने जाण्यासाठी ओडेट हॉटेल-सेरावली रस्ता- अंडर बायपास- सेरावली  जंक्शन ा वेस्टर्न बायपास.

दक्षिणेहून उत्तरेकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग

वास्कोहून पणजीकडे- चिखली जंक्शन-366 राष्ट्रीय महामार्ग- सेंट जासिंतो बेट-कुठ्ठाळी- नवीन जुवारी पूल.

मडगावहून पणजीकडे जाण्यासाठी

इस्टर्न बायपास-आर्लेम सर्कल, राज्य महामार्ग 5, राय-बोरी टोल नाका- रासई-ठाणे- कुठ्ठाळी-कुठ्ठाळी जंक्शन- जुवारी पुलावरुन पणजी.

मडगाव शहरातील वाहतूक

कोलवा ते मडगाव शहर

कोलवा-माडेल-रिंग रोड, रेल्वे गेट कोंब-पालिका बाग, मडगाव शहर.

फातोर्डा ते मडगाव शहर

मुरिडा-आगाळी-बोर्डा-होली स्पिरीट- हॉस्पिसिओ इस्पितळ-मडगाव शहर.

नुवे ते मडगाव शहर

नुवे-गोवा राजी-आर्लेम  बोल्शे-बोर्डा-होली स्पिरीट- हॉस्पिसिओ इस्पितळ- शहर तसेच नुवे-सेरावली जंक्शन-अंडरपास-रेल्वे गेट सुरावली-ऑडेट हॉटेल,  रिंगरोड-मडगाव शहर.

सभेच्या जागी जाण्यासाठी मार्ग

उत्तरेकडून मडगावच्या कदंब बसस्थानकाकडे येण्यासाठी:

राष्ट्रीय महामार्ग 66-नुवे-जिल्हा इस्पितळ-अंबाजी येथे उतरणे व  प्रेझेंटेशन स्कूल मैदानावर वाहने पार्क करावीत.

दक्षिणेकडून कदंब बस स्थानकाकडे येण्यासाठी

आर्लेम-मडगाव शहर-जुने मार्केट-जुने मार्कटजवळ उतरणे व पार्किंग जागेत वाहने पार्क करावीत.

खालील रस्त्यावर वाहने पार्क करता येणार नाही

राज्य महामार्ग 5 आर्लेम-नेहरु स्टेडियम-जुने मार्केट.

अंबाजी सर्कल ते बोर्डा येथील फालेरो जंक्शन -फॅब इंडिया -लॉरेन्स वाझ यांचे घर या रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क करुन ठेवता येणार नाहीत. बोर्डा येथील युरिक सिल्वा यांचे घर ा बी. एम. सर्व्हीय मार्गे दामबाब सर्कलपर्यंतच्या रस्त्यावर वाहने पार्क करता येणार नाहीत. राष्ट्रीय महामार्ग 66 मडगावचे कनिष्ठ न्यायालय इमारत ते जुने मार्केटमार्गे मडगाव जिल्हा इस्पितळ. सुरावली ओव्हर ब्रिज ते वेस्टर्न बायपासवरील नुवे रस्ता या रस्त्याच्या बाजून वाहने पार्क करुन ठेवता येणार नाहीत. कदंब बसस्थानकाच्या मागे असलेल्या जोगस पार्क जंक्शन ते पियेदाद कपेलपर्यंत वाहने पार्क करुन ठेवता येणार नाहीत. सम्राट गार्डन ते नेहरु स्टेडियम गेट नं 10 पर्यंत वाहने पार्क करुन ठेवता येणार नसल्याचे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे. व्ही फोर फातोर्डा मैदान-जे. जे. कॉश्ता इस्पितळ-अंबाजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क करता येणार नसल्याचे पोलिसांनी कळविले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article