मिरज-बेळगाव, मिरज-लोंढा पॅसेंजरच्या वेळेत बदल
बेळगाव : मिरज-बेळगाव व मिरज-लोंढा या दोन अनारक्षित रेल्वेंच्या वेळापत्रकात शुक्रवार दि. 18 पासून बदल करण्यात येणार आहे. मिरज-बेळगाव रेल्वे सायंकाळी 7.10 वा. मिरज येथून निघणार आहे. 7.20 वा. विजयनगर, 7.32 वा. शेडबाळ, 7.44 वा. उगार खुर्द, 7.55 वा. कुडची, रात्री 8.06 वा. चिंचली, 8.19 वा. रायबाग, 8.34 वा. चिकोडी रोड, 8.44 वा. बागेवाडी, 8.53 वा. घटप्रभा, 9.04 गोकाक रोड, 9.14 वा. परकनहट्टी, 9.23 वा. पाश्चापूर, 9.34 वा. सुलधाळ, 9.48 वाजता सुळेभावी, 10 वा. सांबरा तर 10.22 वा. बेळगाव येथे पोहोचणार आहे. मिरज-लोंढा पॅसेंजर मिरज येथून सायंकाळी 5.35 वा. निघणार आहे. 5.45 वा. विजयनगर, 5.54 वा. शेडबाळ, 6.04 वा. उगार खुर्द, 6.14 वा. कुडची, 6.24 वा. चिंचली, 6.32 वा. रायबाग, 6.43 वा. चिकोडी रोड, 6.51 वा. बागेवाडी, 7 वा. घटप्रभा, 7.11 वा. गोकाक रोड, 7.19 वा. परकनहट्टी, 7.27 वा. पाश्चापूर, 7.34 वा. सुलधाळ, 7.42 वा. सुळेभावी, 7.50 वा. सांबरा, 8.30. वा. बेळगाव, 8.49 वा. देसूर, रात्री 9 वा. इदलहोंड, 9.10 वा. खानापूर, 9.23 वा. गुंजी. तर रात्री 10.35 वा. लोंढा येथे पोहोचणार आहे, अशी माहिती नैर्त्रुत्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.