For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोग्य विम्यांच्या दाव्यातील नियमात बदल

06:01 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरोग्य विम्यांच्या दाव्यातील नियमात बदल
Advertisement

वृत्त्संस्था/ नवी दिल्ली

Advertisement

समजा तुम्ही काही दिवस हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहात. तुम्हाला डिस्चार्ज मिळणार असल्याचे घोषित करतात. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी तुम्हाला आणखी काही वेळ थांबण्यास सांगतात. दुपार उलटून संध्याकाळ झाली, परंतु तुमचा आरोग्य विम्याचा दावा अद्याप मंजूर झालेला नाही म्हणून तुम्हाला रुग्णालयातून सोडण्यात आले नाही. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत विमा कंपनी बिलांवर सही करत नाही तोपर्यंत हॉस्पिटल तुम्हाला डिस्चार्ज देणार नाही. यामुळे  हॉस्पिटलचे बिलही वाढेल. असे अनेक लोकांसोबत आजवर दररोज घडते आहे. मात्र या गोष्टी आता बंद होणार असून आयआरडीएआय यांनी विम्याच्या नियमावलीत बदल केले असल्याने आता ही प्रक्रिया सुलभ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या समस्येच्या पार्श्वभूमीवर, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) ने मास्टर परिपत्रक जारी केले आहे.

Advertisement

? 29 मे रोजी याने 55 परिपत्रके रद्द केली आहेत आणि पॉलिसीधारकाचे आरोग्य विम्याचे सर्व अधिकार एकाच ठिकाणी आणले आहेत.

? विमा कंपनीला हॉस्पिटलकडून डिस्चार्जची विनंती मिळाल्यानंतर 3 तासांच्या आत अंतिम अधिकृतता द्यावी लागेल.

? कोणत्याही परिस्थितीत पॉलिसीधारकाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज        मिळण्याची वाट पाहण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.

?  विलंब         झाल्यास आणि हॉस्पिटलने अतिरिक्त शुल्क आकारल्यास, विमा कंपनी ते शुल्क उचलेल. त्याचा बोजा पॉलिसीधारकावर टाकता येत नाही.

? 60 महिन्यांच्या सतत कव्हरेजनंतर कोणतीही फसवणूक सिद्ध न झाल्यास, आरोग्य धोरण आणि दावा विवादित होणार नाही.

Advertisement
Tags :

.