Tasgaon Water Supply | तासगाव पालिकेचा कडक इशारा! पाण्याचा अपव्यय केल्यास थेट नळ कनेक्शन तोडणार;
तासगावः तासगाव नगरपरिषदेच्यावतीने शहरात दररोज विविध भागात वेगवेगळ्या वेळेत पाणी पुरवठा होत आहे. पैकी काही भागात पाणी पुरवठा वेळेत बदल करण्यात आला असून याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. शहरात एक दिवसा आड पाणी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
तासगाव नगरपरिषदेमार्फत विटा नाका पाण्याची टाकी वरून दररोज केला जाणाऱ्या दुपार व सायंकाळी सत्रातील काही भागातील पाणी पुरवठा वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. गुरूवार पेठ, काशिपुरा गल्ली, घिसाडी. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.पूल, बापूवाडी, पोलीस लाईन, कोळी गल्ली, मार्केट यार्ड या परिसराचा पाणी पुरवठा मंगळवार २३ जून पासून एक दिवसा आड सकाळी ६ वाजता होणार आहे.
तसेच चिंचणी रोड पिरजादे नगर, बारस्कर नगर, स्वप्नपूर्ती कॉलनी, शिंपी गल्ली व कासार गल्ली या
भागातील सायंकाळी ७ वाजता होणारा पाणी पुरवठा हा मंगळवार २३ जून पासून एक दिवसा आड सकाळी ७वाजता केला जाणार आहे. याची त्या त्या भागातील नागरिकांनी नोंद घेऊन पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.
... अन्यथा नळ कनेक्शन तोडणीची कारवाई
नगरपरिषदेच्यावतीने पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी करावा, पाण्याचा वापर गटारी, गाड्या व रस्ते धुण्यासाठी करू नये, नगरपरिषदेमार्फत गठित करणेत आलेल्या पथकास असे प्रकार आढळून आल्यास संबंधिताविरून दंडात्मक तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता नळ कनेक्शन तोडणीची कारवाई करणेत येईल असे ही नगरपरिषदेच्यावतीने स्पष्ट करणेत आहे