महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हुबळी-दादर एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल

11:47 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : हुबळी-दादर एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात 29 फेब्रुवारीपासून काहीसा बदल करण्यात आला आहे. हुबळी ते कुडची रेल्वेस्थानकादरम्यान वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. दुपदरीकरण व विद्युतीकरणामुळे कमी वेळेत एक्स्प्रेस पोहोचत असल्याने वेळापत्रकात टप्प्याटप्प्याने बदल करण्यात येत आहे. यापुढे हुबळी येथून ही एक्स्प्रेस 3.40 वाजता निघणार आहे. धारवाड येथे 4.02 वाजता, अळणावर 4.39, लोंढा 5.18, बेळगावला 6.15, घटप्रभा 7.20, चिकोडी रोड 7.35, रायबाग 7.50, कुडची 8.08 वाजता पोहोचणार आहे.

Advertisement

चिंचली रेल्वेस्टेशनवर थांबा

Advertisement

मायाक्का चिंचली देवीची यात्रा होणार असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने तात्पुरत्या स्वरुपात एक्स्प्रेसला चिंचली रेल्वेस्टेशनवर थांबा दिला आहे. 24 ते 29 फेब्रुवारी दरम्यान दादर-तिरुवेनवेल्ली, तिरुवेनवेल्ली-दादर, दादर-पुदुच्चेरी, पुदुच्चेरी-दादर, दादर-म्हैसूर, म्हैसूर-दादर, तिरुपती-कोल्हापूर, कोल्हापूर-तिरुपती या एक्स्प्रेस चिंचली रेल्वेस्थानकावर एक मिनिटासाठी थांबणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article