For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधानसभा निवडणूक निकाल तारखेत बदल

06:31 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
विधानसभा निवडणूक निकाल तारखेत बदल
Advertisement

अरुणाचल, सिक्कीममध्ये 4 ऐवजी 2 जूनला मतमोजणी ,लोकसभा निवडणूक निकालाच्या तारखेत बदल नाही 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

निवडणूक आयोगाने रविवारी अऊणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख 4 जूनऐवजी 2 जून केली आहे. यापूर्वीच्या निवडणूक कार्यक्रम घोषणेनुसार निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार होती. परंतु दोन विधानसभांचा कार्यकाळ 2 जून रोजी संपत असल्याने ही तारीख बदलण्यात आली आहे, असे आयोगाने म्हटले आहे. तसेच अऊणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या लोकसभा मतदारसंघांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, असे त्यात नमूद केले आहे.

Advertisement

सिक्कीम, ओडिशा, अऊणाचल प्रदेश आणि आंध्रप्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकांसोबतच विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. आंध्रप्रदेशात 18 एप्रिलला अधिसूचना निघेल आणि 13 मे रोजी मतदान होईल. अऊणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये 20 मार्च रोजी अधिसूचना आणि 19 एप्रिल रोजी मतदान होईल. तर ओडिशात 18 एप्रिलला पहिली अधिसूचना आणि 13 मे रोजी पहिला टप्पा होईल. त्यानंतर 20 मे, 25 मे आणि 1 जून असे पुढील तीन टप्प्यात मतदान होईल, असे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.

Advertisement

.