कोल्हापूरची नाळ कधी तुटणार नाही, साथ कधी सोडणार नाही! मंत्री चंद्रकांत पाटील
मंत्रीपद मिळाल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापुरात जंगी स्वागत
कोल्हापूरः
आमदार चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पद मिळाल्यावर कोल्हापूराला भेट दिली. कोल्हापूरात मंत्री चंद्रकांत पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मंत्रीपद मिळाल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच कोल्हापूरात आले.
यावेळी पाटील म्हणाले, मी मूळचा कोल्हापूरचाच आहे. जबाबदाऱ्या अनेक वाढल्या मात्र केंद्र कोल्हापुरात राहिलं.
कोल्हापूरची नाळ कधी सुटली नाही, तुठली नाही आणि तुटणारही नाही. 2019 ला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पद मंत्रीपद मिळालं तेव्हा सर्वांना वाटलं दादांना बाजूला केलं. मात्र काही जणांना माहीत होतं 2020 साली नवीन शैक्षणिक धोरणाची घोषणा होणार आहे. त्यावेळी जुना अनुभव असलेला शिक्षण मंत्री हवा होता. मी विद्यार्थी परिषदेत काम केल्याने मला हे सर्व माहीत होतं. यामुळे आम्ही देशात नवीन शिक्षण धोरण राबवण्यात दुसरे आलो. हे पुढे आणखी चालवायचा आहे एकाच माणसाकडे सलग खात राहिलं तर आणखी बरंच काही करता येईल म्हणून हेच खात पुन्हा मला मिळालं. आमचा पुढे शंभर दिवसाचा रोड मॅप तयार आहे. त्याचा प्रेझेंटेशन देखील झालेला आहे.
प्राध्यापकाने कोणत्याही भाषेत शिकवलं तर विद्यार्थ्याला मराठी भाषेत कळावं असं सॉफ्टवेअर देखील डेव्हलप करण्यात आलेला आहे
तिन्ही पक्षात समन्वय आहे आणि त्रिमूर्तीच्या चर्चेने कोणते जिल्हे तेथील राजकीय वातावरण पाहून ,कोणत्या जिल्ह्याला कोणाची आवश्यकता आहे त्यानुसार जोड्या लावतील. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सहा दिवसाचं अधिवेशन असून देखील चार ते साडेचार तासाचा चर्चेला विषय दिला सर्वांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा रिप्लाय दिलं त्यात त्यांनी कोणताही शंका ठेवलेली नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे मी कोणाचाही मुलायजा ठेवणार नाही त्यानुसार ते पावलं उचलत आहेत. प्रत्येकाने भावना व्यक्त करणे यात काही गैर नाही मात्र देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडणार नाहीत.
पुढे बोलताना पाटील यांना धनंजय मुंडे यांच्या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, या संदर्भात देवेंद्र फडणवीस ठरवतील. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डावा उजवा असं कधीही नसतं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीच चारित्र आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमी काळजी घेतले. राजकीय वाद सुरू आहे यामध्ये काही प्रमाणात सामाजिक आणि संवेदनशील पण आहेत यामध्ये अभिनेत्रीच नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाहीत. सुरेश धस यांना आज मी फोन करणार आहे. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये. प्राजक्ता माळी यांनी देखील काल पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केला आहेत. मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार आहे पक्षाचे आमदार असून देखील तुम्ही असं काम करत आहे. हे तुम्ही असं करू नये, असे प्रतिपादन पाटील यांनी केले.