For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंद्राबाबू नायडूंना नियमित जामीन मंजूर

06:39 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
चंद्राबाबू नायडूंना नियमित जामीन मंजूर
Advertisement

स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन घोटाळाप्रकरणी दिलासा

Advertisement

वृत्तसंस्था/ अमरावती

कौशल्य विकास महामंडळ घोटाळा प्रकरणात आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने सोमवारी टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना नियमित जामीन मंजूर केला. न्यायालयाने नायडू यांच्या चार आठवड्यांच्या अंतरिम वैद्यकीय जामिनाचे पूर्ण जामिनात रूपांतर केले असून आता नियमित जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. या प्रकरणात त्यांना दिलासा देतानाच कौशल्य विकास महामंडळ घोटाळा प्रकरणाशी संबंधित कोणतीही सार्वजनिक टिप्पणी करणे किंवा सार्वजनिक रॅली आणि सभा आयोजित करणे किंवा त्यात भाग घेणे टाळावे, असे निर्देश दिले आहेत. 29 नोव्हेंबरपासून या अटी शिथिल केल्या जातील, असे उच्च न्यायालयाने सांगितले.

Advertisement

चंद्राबाबू नायडू यांना 9 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी अंतरिम वैद्यकीय जामिनावर सुटका करण्यात आली होती. आता त्यांचा जामीन नियमित करण्यात आला आहे. कौशल्य विकास महामंडळाच्या निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली नायडू यांना अटक करण्यात आल्यामुळे राज्याच्या तिजोरीला 300 कोटी ऊपयांहून अधिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता.

28 नोव्हेंबरपर्यंत अटी लागू

कौशल्य विकास महामंडळ घोटाळा प्रकरणाशी संबंधित कोणतीही सार्वजनिक टिप्पणी करणे किंवा सार्वजनिक रॅली आणि सभा आयोजित करणे किंवा त्यात सहभागी होणे यासारख्या अंतरिम जामीन अटी 28 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील. 29 नोव्हेंबरपासून या अटी शिथिल केल्या जातील, असे न्यायालयाने सोमवारी सांगितले. न्यायालयाने नायडू यांना त्यांचा वैद्यकीय अहवाल राजमहेंद्रवरम मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांकडे सोपवण्याऐवजी 28 नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी विजयवाडा येथील विशेष न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले. नायडू यांच्यावर अलीकडेच हैदराबाद येथील एलव्ही प्रसाद हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.