For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंद्रा विजय सिंग प्रशिक्षकपदी

06:34 AM Jan 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
चंद्रा विजय सिंग प्रशिक्षकपदी
Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

आगामी होणाऱ्या प्रो कुस्ती लीग स्पर्धेसाठी टायगर्स ऑफ मुंबई दंगल्स संघाच्या dरशिक्षकपदी माजी राष्ट्रीय प्रशिक्षक चंद्र विजय सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल 6 वर्षांच्या कालावधीनंतर चंद्रा विजय सिंग प्रो कुस्ती लीगमध्ये पुनरागमन करीत आहेत.

चंद्रा विजय सिंग यांनी यापूर्वी आपल्या कारकिर्दीत दोनवेळा प्रो कुस्ती लीग स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. 2026 सालातील प्रो कुस्ती लीग स्पर्धा 16 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत 6 फ्रांचायझींचे संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी मल्लांचा लिलाव 3 जानेवारीला आयपीएलच्या धर्तीवर केला जाईल. अव्वल मल्ल अमन सेहरावत, अंतिम पांगल, दीपक पुनिया, अनशु मलिक, ललिता सेहरावत, मानसी अहलावत, किरण बिस्नॉई, चिराग चिक्करा यांना विकत घेण्यासाठी सहा फ्रांचायझी सज्ज झाल्या आहेत. 2015 साली पहिल्यांदा ही स्पर्धा घेतली गेली होती. त्यानंतर सदर स्पर्धा 2019 साली रद्द करण्यात आली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.