For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Chandoli National Park | निसर्गप्रेमींनो जरा थांबा! चांदोली अभयारण्याबाबत वनविभागाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय!

11:50 AM Jun 16, 2026 IST | NEETA POTDAR
chandoli national park   निसर्गप्रेमींनो जरा थांबा  चांदोली अभयारण्याबाबत वनविभागाने घेतला  हा  महत्वाचा निर्णय
Advertisement

Advertisement

वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचांदोली अंतर्गत सुरू असलेले निसर्ग पर्यटन पावसाळी हवामानामुळे आज १५ जूनपासून १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

जंगल पावसाच्या काळात परिसरातील रस्ते निसरडे होणे, ओढेनाले वाहू लागणे तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत पर्यटक व निसर्गप्रमींनी चांदोलीतील निसर्ग पर्यटनासाठी येण्याचे नियोजन टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

तसेच पर्यटकांनी निसर्ग संवर्धन व वनविभागाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असेही वनविभागाने प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.

Advertisement
Tags :

.