For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चांदोली धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ! ११५८८ क्युसेक विसर्ग : वारणा नदीकाठच्या गावांना धोका वाढला

06:29 PM Jul 31, 2024 IST | Abhijeet Khandekar
चांदोली धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ  ११५८८ क्युसेक विसर्ग   वारणा नदीकाठच्या गावांना धोका वाढला
Chandoli dam
Advertisement

वारणानगर / प्रतिनिधी

वारणा नदीचा जलसाठा असलेल्या वसंत सागर या चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टीचा ओसरलेला जोर पुन्हा वाढल्याने विसर्गात वाढ केली असून आज बुधवार दि.३१ रोजी १२३० वा. पासून ११५८८ क्यूसेक नदीपात्रात विसर्ग सुरू झाल्याने वारणा काठच्या गांवाना पुराचा धोका कायम राहीला आहे.

Advertisement

पावसाचा जोर ओसरल्यावर धरणातून १६९७६ क्यूसेकने नदीपात्रात सुरू केलेला विसर्गात सोमवारी ४६९१ क्युसेक तर मंगळवार सकाळ पासून ४५९९ अशी एकूण ८८८४ क्यूसेक अशी मोठी कपात केल्याने नदीकाठच्या गांवाना दिलासा मिळाला होता. पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने ३४९३ क्यूसेक विसर्ग वाढवला आहे.

विसर्ग कमी केल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा कमी होत चालला असल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. पुन्हा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर वाढल्याने आजवर २६२५ मि. मी पाऊस पडला आहे.शनिवार पासून काही अंशी पाऊस उघडला असलातरी धरण क्षेत्रात बुधवार सकाळ पर्यंन्त ७३ मि.मी दुपारी ४ वा. पर्यन्त देखील ४७ मि.मी पाऊसाची नोंद झाली आहे.

Advertisement

चांदोली धरणातून नदी पात्रात मंगळवार दि.२३ पासून सुरू केलेल्या विसर्गात टप्या टप्याने वाढ करून सोमवार दि.२९ सकाळ पर्यंन्त १६९७६ क्यूसेक विसर्ग सुरू होता या विसर्गाने धरणातील पाणी साठा चार दिवसात ४ टिएमसी ने कमी झाला आहे.

चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी असून पाणी साठा २९.६१ टीएमसी होऊन धरण ८६.०५ टक्के भरले आहे. जलाशय परिचालन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग चालू झाल्याने नदीकाठच्या दोन्ही बाजूची हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे.सद्या नदीपात्रात वीजनिर्मिती साठी १४७० व वक्र द्वारातून १०११५ क्युसेक असा १०५८८ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

वारणा नदीच्या पाणीपातळी कमी होत चालली आहे पात्राबाहेर गेलेले पाणी ओसरू लागले आहे. नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर नदीकाठची हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली होती. दरम्यान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त होईल त्यादृष्टीने धरणातील विसर्ग राखला जातो असे पाटबंधारे कोडोली उपविभागाचे सहा. अभियंता मिलींद किटवाडकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.