Chandgad news | चंदगड हादरले! लग्नाला आठवडाही झाला नाही, अन् नवविवाहित तरुणाने संपवलं जीवन
तुडये येथील ३४ वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या
तुडये -तुइये येथील एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नामदेव जोतिबा चांदिलकर (वय ३४, रा. तुहये ता. चंदगड) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी उघडकीस आली. सकाळीआठवड्यापूर्वी झाला होता विवाहनामदेव याचा विवाह नात्यातीलच मुलीशी आठवड्यापूर्वी झाला होता. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी शुक्रवारी रात्री ११.३० वाजता नामदेव हा घरी झोपला होता. त्यानंतर पहाटे ६.३० वाजण्याचा सुमारासत्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. सकाळी घरच्यांना त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. वडील जोतिबा चांदिलकर यांनी चंदगड पोलिसात घटनेची नोंद दिल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल आंबुलकर यांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.