महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आम आदमी पक्षाकडून दिल्लीत निदर्शने; चंदीगड निवडणुकीतील प्रकार अत्यंत लाजिरवाणा : केजरीवाल

06:46 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Chandigarh mayoral election.
Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

चंदीगड महापौर निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते दिल्लीतील रस्त्यांवर उतरले आहेत. भाजपने या निवडणुकीत गैरप्रकार केले असून आता लोकशाही वाचविण्यासाठी लोकांनीच पुढाकार घ्यावा असे आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जनतेला उद्देशून शुक्रवारी म्हटले आहे. भाजप मुख्यालयाला घेराव घालून आमचा विरोध दर्शविणार आहोत असे केजरीवालांनी सांगितले, परंतु भाजप मुख्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर दुसरीकडे भाजप देखील केजरीवाल यांच्या विरोधात निदर्शने करत आहे. केजरीवालांनी भ्रष्टाचार केल्याचा भाजपचा आरोप आहे.

Advertisement

चंदीगड महापौरपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली होती, यात भाजपचा उमेदवार विजयी झाला होता. भाजपने महापौर, वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर या तिन्ही पदांवर विजय मिळविला होता. या निवडणुकीच्या निकालामुळे आप-काँग्रेस आघाडीला मोठा झटका बसला आहे. आघाडीने पीठासीन अधिकाऱ्यावर मतपत्रिकेसोबत फेरफार केल्याचा आरोप केला आहे.

भाजपकडून मतांचीच चोरी

या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आपने दिल्लीत मोठी निदर्शने केली आहेत, चंदीगड निवडणुकीत घडलेला प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे. महापौर निवडणुकीत भाजपने मतांचीच चोरी केली आहे. भाजपच्या पापाचा घडा आता भरला आहे. चंदीगड महापौर हे पद तुलनेत छोटे होत, लोकसभा निवडणुकीत भाजप कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही. दिल्लीत प्रदर्शन करण्यासाठी हरियाणा, पंजाबमधून लोक पोहोचत आहेत. दिल्लीला छावणीचे स्वरुप देण्यात आले असून लोकांना रोखण्यात आले आहे. जनतेचा आवाज जितका रोखू पाहाल तितकाच तो मोठा होत जाणार आहे. आमचे नगरसेवक आणि नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. आम्ही शांततेत भाजप मुख्यालयाच्या दिशेने जाणार आहोत. पोलिसांनी रोखले तर आम्ही थांबू, आम्हाला कुठलाच संघर्ष करायचा नसल्याचे उद्गार केजरीवाल यांनी काढले आहेत.

भाजपकडून गैरप्रकार

चंदीगडमध्ये 36 नगरसेवकांपैकी 20 इंडिया आघाडीचे होते, तर 16 भाजपच्या बाजूने होते. अशा स्थितीत भाजप कार्यकर्त्याला निवडणूक अधिकारी करण्यात आले. त्यानेच मतदान करविले आणि त्यानंतर निवडणूक एजंटला बाहेर पाठविले आणि स्वत:च मतमोजणी केली आणि इंडिया आघाडीची 8 मते रद्द ठरविली. या मतपत्रिकांवर काहीतरी लिहून त्यांना अवैध घोषित ठरविण्यात आल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social mediaAam Aadmi PartyChandigarh mayoral election.Delhi alleging malpractice
Next Article