For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur ZP Constituency 2025: चंदगडमध्ये चारच गट, गडहिंग्लजमध्ये पाचही मतदारसंघ कायम

05:06 PM Jul 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur zp constituency 2025  चंदगडमध्ये चारच गट  गडहिंग्लजमध्ये पाचही मतदारसंघ कायम
Advertisement

चंदगडमध्ये चार जिल्हा परिषद तर पंचायत समितीचे 8 मतदार संघ असणार

Advertisement

चंदगड : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदार संघाची रचना पूर्ण झाली असून चंदगड तालुक्यात अडकूर, माणगाव, कुदनूर आणि तुडये असे चार जिल्हा परिषद मतदार संघ असणार आहेत. तर पंचायत समितीचे अडकूर, गवसे, माणगाव, कोवाड, कुदनूर, तुर्केवाडी, तुडये, हेरे असे 8 मतदार संघ असणार आहेत.

जिल्हा परिषदनिहाय गावे पुढीलप्रमाणे

Advertisement

अडकूर जिल्हा परिषद : गवसे पंचायत समिती : बुझवडे, कुरणी, कानूर खुर्द, कानूर बुद्रुक, सडेगुडवळे, भोगोली, इनाम म्हाळुंगे, हिंडगाव, कोकरे, गवसे, इब्राहिमपूर, नागवे, उमगाव, जांबरे, कानडी, मजरे शिरगाव, अडकूर पंचायत समिती - शिरोली, अलबादेवी, विंझणे, बोंजुर्डी, अडकूर, उत्साळी, सातवणे, केंचेवाडी, आमरोळी, गणुचीवाडी, आसगोळी, केरवडे, नागनवाडी, कोरज.

माणगाव जिल्हा परिषद : माणगाव पंचायत समिती - दाटे, मुगळी, गुडेवाडी, जट्टेवाडी, तांबुळवाडी, बागिलगे, रामपूर, लाकूरवाडी, माणगाव, लक्कीकट्टे, शिवणगे, म्हाळेवाडी, मलतवाडी, हल्लारवाडी. कोवाड पंचायत समिती - घुल्लेवाडी, तेऊरवाडी, निट्टूर, कोवाड, दुंडगे, चिंचणे, कामेवाडी, राजगोळी खुर्द, राजगोळी बुद्रुक, दिंडलकोप.

कुदनूर जिल्हा परिषद : कुदनूर पंचायत समिती - कालकुंद्री, किटवाड, कागणी, होसूर, किणी, बुक्कीहाळ, कौलगे, महिपाळगड, देवरवाडी, शिनोळी बुद्रुक, शिनोळी खुर्द, कुदनूर. तुर्केवाडी पंचायत समिती - कडलगे बुद्रुक, सुंडी, करेकुंडी, कडलगे खुर्द, ढोलगरवाडी, मांडेदुर्ग, बसर्गे, मौजे कारवे, मजरे कारवे, तडशिनहाळ, तुर्केवाडी, नागरदळे, तावरेवाडी.

तुडये जिल्हा परिषद : तुडये पं. . - हलकर्णी, कलिवडे, जंगमहट्टी, माडवळे, ढेकोळी, सुरुते, हाजगोळी, सरोळी, तुडये, खालसा म्हाळुंगे, कोलिक, मुरकुटेवाडी, धुमडेवाडी. हेरे पं. . : करंजगाव, आंबेवाडी, कोनेवाडी, नांदवडे, खा. कोळींद्रे, पाटणे, मोटणवाडी, हेरे, खालसा गुडवळे, इसापूर, मिरवेल, वाघोत्रे, पार्ले, जेलुगडे, कळसगादे, कोदाळी, आसगाव.

गडहिंग्लज : जिल्हापरिषद मतदारसंघाची रचना आज जाहिर करण्यात आली. यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील नूल, हलकर्णी, भडगाव, गिजवणे, नेसरी असे 5 जिल्हापरिषद मतदारसंघ कायम राहिले आहेतनूल मतदारसंघात हसुरचंपू, हनिमनाळ, शेंद्री, औरनाळ, दुंडगे, माद्याळ, जरळी, नूल, हेब्बाळ, मुत्नाळ, निलजी अशा 11 गावांचा समावेश आहे.

हलकर्णी जिल्हापरिषद मतदारसंघात 19 गावे येत असून यामध्ये बसर्गे, खणदाळ, नांगनूर, अरळगुंडी, इदरगुच्ची, कडलगे, येणेचवंडी, नंदनवाड, नौकूड, हलकर्णी, मनवाड, नरेवाडी, तुप्पूरवाडी, हिडदुग्गी, कळविकट्टे, तेरणी, बगडीकट्टी, कुंबळहाळ चंदनकूड आदी गावे आहेत.

भडगाव जिल्हापरिषद मतदारसंघात भडगावसह चन्नेकुप्पी, तनवडी, खमलेहट्टी, शिंदेवाडी, मुगळी, हणमंतवाडी, महागाव, उंबरवाडी, वैरागवाडी, हसुरवाडी, हसुरसासगीरी, हरळी बु।।, हरळी खुर्द, हुनगिनहाळ, चिंचेवाडी अशी 16 गावे समाविष्ट आहेत.

गिजवणे जिल्हापरिषद मतदारसंघात गिजवणे, हिरलगे, कौलगे, ऐनापूर, इंचनाळ, बेळगुंदी, अत्याळ, कडगाव, बड्याचीवाडी, वडरगे, जख्खेवाडी, शिप्पूर तर्फ आजरा, करंबळी, बेकनाळ, लिंगनूर क।। नूल अशी 15 गावे आहेत. नेसरी जिल्हापरिषद मतदारसंघात सर्वाधिक गावांचा समावेश आहे.

यामध्ये नेसरीसह हडलगे, तारेवाडी, बिद्रेवाडी, वाघराळी, हेब्बाळ-जलद्याळ, लिंगनूर क।। नेसरी, मांगनूर तर्फ सावतवाडी, जांभूळवाडी, मुंगूरवाडी, दुगूनवाडी, मासेवाडी, तेगिनहाळ, बटकणंगले, शिप्पूर तर्फ नेसरी, कडाल, तावरेवाडी, डोणेवाडी, तळेवाडी, अर्जुनवाडी, सावतवाडी तर्फ नेसरी, कानडेवाडी, सरोळी, कुमरी, येमेहट्टी, काळामवाडी, सांबरे अशी 27 गावे आहेत.

गडहिंग्लज तालुका

तालुक्यातील नूल (11), हलकर्णी (19), भडगाव (16), गिजवणे (15), नेसरी (27) अशी एकूण 88 गावे विभागली आहेत. नेसरी जिल्हापरिषद मतदारसंघात 13 वाड्यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.