‘विनोदिनी’मध्ये चंदन रॉय सान्याल
रामकृष्ण परमहंस यांच्या व्यक्तिरेखेत
राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्ममेकर राम कमल मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाखालील चित्रपट ‘विनोदिनी’चे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरमध्sय अभिनेता चंदन रॉय सान्याल हा श्री रामकृष्ण परमहंस यांच्या व्यक्तिरेखेत दिसून येत आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रमोद फिल्म्स, देव एंटरटेनमेंट व्हेंचर्सकडुन संयुक्तपणे केली जात आहे.
विनोदिनी हा चित्रपट उत्तर कोलकात्याच्या रेड लाइट डिस्ट्रिक्टच्या एका मुलीची प्रेरणादायी कहाणी आहे. ही मुलगी एक थिएटर आर्टिस्ट होण्याचे स्वप्न पाहते. अनेक अडचणींवर मात करत तिने विनोदिनी म्हणून ओळख निर्माण केली होती. यानंतर हेच नाव बंगाली थिएटरमध्ये सर्वात मोठे नाव ठरले. परंतु या मुलीच्या भूतकाळाची छाया तिच्या यशाच्या नेहमी आड आली.
विनोदिनी चित्रपटाचे दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांनी या कहाणीला जिवंत स्वरुप दिले आहे. हा चित्रपट 19 व्या शतकातील बंगालच्या थिएटर संस्कृतीविषयी बरेच काही सांगणारा आहे.हा चित्रपट स्वत:च्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आव्हानांना सामोरे जाणाऱ्या महिलांच्या साहसाला नमन करणारा आहे. रामकृष्ण परमहंस यांच्या रुपात चंदन रॉय सान्याल या चित्रपटाचा हिस्सा ठरल्याने कहाणीला अधिकच खोल स्वरुप प्राप्त झाले आहे. या प्रोजेक्टकरता पहिल्यांदा रुक्मिणीसोबत काम करता आल्याचे उdदगार मुखर्जी यांनी काढले आहेत.
विनोदिनी चित्रपटात राहुल बोस, कौशिक गांगुली, मीर, चंद्रेय घोष आणि ओम साहनी यासारखे कलाकार आहेत. प्रियांका पोद्दार यांनी याची कहाणी अन् संवाद लिहिले आहेत.