For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गात 14 व 15 नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

05:18 PM Nov 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्गात 14 व 15 नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
Advertisement

कणकवली / प्रतिनिधी
जिल्हास्तरावरील हवामानाच्या अंदाजानुसार १४ व १५ नोव्हेंबर रोजी विजांचा लखलखाट व मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची भात कापणी पाठीमागे राहिली असल्यास ती लवकरात लवकर करुन घ्यावी ,कापणी बरोबरच झोडणी करुन धान्य सुरक्षित ठिकाणी वाळविण्यास ठेवावे. ज्या शेतकऱ्यांनी भात कापणी करुन पेंढा शेतात, मोकळ्या जमिनीवरती व रस्त्याच्या कडेला वाळवत घातलेला असेल त्यांनी लवकरात लवकर भात पिकाची झोडणी करुन धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आधाहन ग्रामिण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदेचे प्रमुख डॉ. पी. सी. माळी यांनी केले आहे.

Advertisement

सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यालगत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर हवामान प्रणाली गौण (Insignificant) व स्थानीक असुन त्यामुळे मेघगर्जनेसह हलक्या ती मध्यम स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह पडणारा पाऊस हा शक्यती दुपार नंतर पडतो. त्यामुळे भात पिकाची कापणी शक्यतो सकाळच्या वेळेत करावी, वैभव विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत कापणी केल्यास खोडकिडीच्या अळ्या पेंढ्यामध्ये येतात व पुढील वर्षी आत पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर वेळेत व खचर्चात बचत होऊ शकते. कोणत्याही परिस्थीतीमध्ये कापलेले भात पिक उघड्यावरती शेतात ठेवू नये, कापलेल्या भात पिकाची झोडणी शक्य नसल्यास पेंढा सुरक्षितरित्या झाकून ठेवावा. पाऊसाची शक्यता असल्याने भात झोडणीनंतर धान्य वाळवायचे असल्यास पाऊसाचा अंदाज पाहुनच वाळत घालण्यात यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.