पणोरे येथील परितकर महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ऑनलाईन उद्घाटन
म्हासुर्ली / वार्ताहर
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा मार्फत दुर्गम धामणी खोऱ्यातील पणोरे (ता.पन्हाळा) येथील लहू बाळा परितकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला.
वर्धा येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांचा दूरदृश्य प्रणाली द्वारे शुभारंभ केला. यामध्ये दुर्गम अशा धामणी खोऱ्यातील पणोरे येथील लहू बाळा परितकर महाविद्यालयात नव्याने सुरु होणाऱ्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या शुभारंभाचा समावेश होता.
सकाळपासून महाविद्यालयात कार्यक्रम संपन्न करण्याकरीता नियोजन करण्यात आले होते.दुपारी पंतप्रधान मोदी यांनी रिमोटच्या साह्याने दूरदृष्टी प्रणालीद्वारे केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.सदर कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ.सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संकल्पना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती होती.
तर पणोरे येथील कार्यक्रमस्थळी कला शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारुतीराव पारितकर, कार्याध्यक्ष मंदार परितकर,पणोरेचे सरपंच मारुती पाटील, ज्ञानदेव पाटील,केंद्रप्रमुख आर.टी.बरगे, पन्हाळा आयटीआयचे पी.बी कांबळे, उपसरपंच प्रवीण कांबळे, गंगुबाई बळीप, श्रीधर पाटील, संजय पाटील,एस.पाटील, पत्रकार युवराज भित्तम यांच्यासह कलाशिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी,शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक उपस्थित होते.प्रास्ताविक ए.एस संघर्षी यांनी तर सूत्रसंचालन एस.आर उबारे यांनी केले.तर आभार प्राचार्य एस.एन कांबळे यांनी मानले.