'चॅम्पियन'मुळे विद्यार्थ्यांना चौफेर ज्ञान
कोल्हापूर :
शालेय शिक्षणाबरोबरच विश्वातील घडामोडींचे तसेच स्पर्धा परीक्षेसाठी ज्ञानाची पेरणी करणाऱ्या तरुण भारत संवादची चॅम्पियन ही पुरवणी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चौफेर ज्ञान मिळत असल्याचे प्रतिपादन आदर्श विद्यानिकेतनचे उपप्राचार्य एम. ए. परीट यांनी केले.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज मिणचे (ता. हातकणंगले) या प्रशालेत तरुण भारत संवाद चॅम्पियन सामान्य ज्ञान व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
स्पर्धेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्राचार्य डॉ. डी. एस. घुगरे, उपप्राचार्य एम. ए. परीट, डॉ. सी. एम. बागणे, कलाशिक्षक ए. एस.देशपांडे, शिवाजी पाटील, डॉ. दीपक शेटे, तरुण भारत कोल्हापूरचे वितरण विभाग प्रतिनिधी उदय जाधव, पत्रकार संतोष सणगर आदी उपस्थित होते.