For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बालिंगा पाणी योजनेतील चेंबर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर

11:02 AM Nov 06, 2023 IST | Kalyani Amanagi
बालिंगा पाणी योजनेतील चेंबर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर
Advertisement

मंगळवार पर्यंत पाणीपुरवठ्याचा प्रयत्न

Advertisement

वाकरे प्रतिनिधी 
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगे येथील पाणीपुरवठा योजनेतील चेंबर दुरुस्तीचे काम धोकादायक असून ते युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिकेचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.

या प्रतिनिधीने रविवारी सायंकाळी सहा वाजता बालिंगे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनला भेट दिली, त्यावेळी नेत्रदीप सरनोबत बोलत होते.सध्या पडलेल्या चेंबरपर्यंत जाण्यासाठी उलट्या बाजूने जॅकवेल मधून चेंबरच्या तोंडापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असून यामध्ये चेंबर ढासळल्यास अथवा कोसळल्यास मजुरांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यामुळे पर्यायी हॉरीझानटल पाईप टाकून त्या पाईपमधून मजुरांना पुढे पाठवून चेंबरमधील दगड काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार आहे. सध्या आठ फूट लांबीच्या आणि चार फूट उंचीच्या पाईप आणल्या असून या पाईपमधून कामगारांना पुढे पाठवून चेंबरमधील दगड काढण्यात येणार असल्याचे नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. अत्यंत धोकादायक असणारे हे काम पाणबुड्या रुपेश भोसले ( दानोळी) यांच्या १३ जणांची टीम तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी रात्रंदिवस युद्ध पातळीवर हे काम करत आहेत.

Advertisement

सध्या पाणी उपसा करणारे दोन्ही पंप बंद असल्याने कोल्हापूर शहराला नागदेववाडी पाणी योजनेतून एका पंपातील पाणी चंबूखडी टाकीमध्ये टाकून तात्पुरत्या स्वरूपात ठीक ठिकाणी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अभिलाषा दळवी, जय जाधव, एस. एस. भेटकर, राजेंद्र हुजरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. ४ फूट बाय ५ फूट चेंबर-  जॅकवेलच्या दिशेने जाणारा हा चेंबर ४ बाय ५ फूट आकाराचा असून यामधून कामगारांना उभे जाणे अशक्य आहे, त्यामुळे वाकून पराकोटीचा आणि धोकादायक प्रयत्न करीत हे कामगार चेंबरमधील दगड काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Advertisement
Tags :

.