For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पक्षातील बंडखोरांना शांत करण्याचे नेत्यांसमोर आव्हान

12:20 AM Nov 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
पक्षातील बंडखोरांना शांत  करण्याचे नेत्यांसमोर आव्हान
Advertisement

प्रतिनिधी/ मुंबई

Advertisement

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. महायुती विऊद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत राज्यभरात पाहायला मिळत आहे. अशातच त्यामुळे सध्या मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पक्षातील बंडखोरांना कसे शांत करायचे, यासाठी वरिष्ठ नेत्यांमध्ये खल चालू आहे. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांकडून नाराज नेत्यांची मनधरणी करणे चालू आहे.

राज्यातील बहुतांश मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती विऊद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत आहे. मात्र, इच्छुकांना पक्षाकडून संधी न मिळाल्याने अनेकांनी थेट नाराजी दर्शवत अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे, बहुतांश मतदारसंघात बंडखोरी पाहायला मिळत असून नेते मंडळी बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी समजूत काढत आहे. मात्र, अद्याप उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले नाहीत.

Advertisement

विधानसभेसाठी 4 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.पक्षातील बंडखोरांना कसे शांत करायचे, यासाठी वरिष्ठ नेत्यांमध्ये खल चालू आहे. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांकडून नाराज नेत्यांची मनधरणी करणे चालू आहे. एकीकडे महाविकास आघाडी विरूध्द महायुती लढाई असताना दुसरीकडे आघाडी आणि युतीतील मित्रपक्षांनीच एकमेकांसमोर उमेदवार दिल्याने सर्वच नेत्यांची खरी कसोटी आज लागणार आहे. काही मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता मित्रपक्षातील नेत्यांनी एकमेकांसमोर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसरीकडे तिसरी आघाडी आणि मनोज जरांगे यांचे उमेदवार यामुळे काही विधानसभात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

सदा सरवणकर ,गोपाळ शेट्टी यांच्या भुमिकेकडे लक्ष

मुंबईतील सर्वात महत्वाची लढत असलेल्या माहीम या शिवसेनेच्या बालेकिल्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहिर केली आहे,तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर या मतदार संघातुन 3 टर्म आमदार आहेत,सरवणकर हे निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत,तर दुसरीकडे राज्यातील भाजपसाठी सर्वात सुरक्षित असलेल्या बोरीवली विधानसभा मतदार संघातुन भाजपचे नाराज गोपाळ शेट्टी यांनी बंड केले आहे,त्यामुळे शेट्टी यांचे बंड शमणार का ? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

युती आणि आघाडीतील मित्रपक्षांमध्ये तणाव वाढणार

निवडणूकीत संख्याबळाला विशेष महत्व आल्याने आघाडी आणि युतीचा धर्म धाब्यावर बसवुन मित्रपक्षांनीच बंडाचे निशाण फडकवल्याने एकीकडे युती आणि आघाडीत तणाव निर्माण झालेला आहे,पक्षाने उमेदवारांनी एबी फॉर्म दिल्यानंतर काही उमेदवार नेतृत्वाचा आदेश न मानता निवडणूक लढण्यावर ठाम आहे,त्यामुळे युती आणि आघाडीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

.