कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीचे आव्हान

04:36 PM Mar 18, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली : 

Advertisement

मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील घरपट्टी आणि पाणीपट्टीचे सुमारे 42 कोटी रूपये वसुलीचे आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे. या वसुलीसाठी जिल्ह्यात यंत्रणा कामाला लागली आहे. मुदतीत कर न भरल्यास कारवाईचा इशारा जिल्हा परिषदेने दिला आहे.

Advertisement

मार्च महिना असल्याने जिल्हा परिषदेने घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम वसुल करण्यासाठी तालुका आणि गावपातळीवर यंत्रणा कामाला लावली आहे. फेब्रुवारी अखेर सुमारे 70 कोटी इतकी वसुली केली आहे. तर सुमारे 42 कोटी वसुल करणे बाकी आहे. घरपट्टीची 66 कोटी 25 लाख इतकी मागणी असून यातील 41 कोटी 16 लाख इतके वसुल केले असून याची टक्केवारी 63 आहे. तर पाणीपट्टीची 45 कोटीची मागणी होती पैकी 28 कोटी 51 लाख इतके वसुल झाले असून याची टक्केवारी 42 आहे.

घरपट्टीमध्ये सर्वाधिक पलुस तालुक्याची 72.69 टक्के वसुली झाली आहे. तर सर्वात कमी 45 टक्के कडेगावची वसुल आहे. घरपट्टीमध्ये 75.85 टवके तर कडेगावची 45.64 टक्के वसुल झाली आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीमध्ये आटपाडी -62.56, 62.d1, जत-56.31, 55.39, खानापूर 70.74, 69.21, कवठेमहकांळ - 67.77, 66.42, मिरज - 53.93, 53.69 शिराळा 71.80, 75.85, तासगाव - 68.81, 64.22, वाळवा - 64, 65 टक्के इतकी वसुल झाली आहे.

जिल्हा परिषदेने 11 महिन्यात घरपट्टी आणि पाणीपट्टीची 70 कोटी इतकी रक्कम वसुल केली आहे. मार्च या एका महिन्यात तब्बल 42 कोटींवर वसुल करण्याचे मोठे आव्हान आहे. वसुलीसाठी जिल्हापरिषदेसह तालुका आणि गाव गातळीवरील यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. वसुली न भरण्याऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई केली जात आहे. नोटीसाही देण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article