For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | खडू आणि फळा ही जिल्हा परिषद शाळाहे चित्र बदलतय...!

03:31 PM Mar 25, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   खडू आणि फळा ही जिल्हा परिषद शाळाहे चित्र बदलतय
Advertisement

               किणी – कन्या विद्यामंदिर शाळेत रोबोटिक लॅब आणि ई-लर्निंग सुरू

Advertisement

किणी (शांतीनाथ पाटील ) : घुणकी. दि. 23. ख डू आणि फळा... जिल्हा परिषद ची शाळा ही ओळख व चित्र आता झपाट्याने बदलताना चे आशादायी चित्र दिसत आहे. किणी (ता. हातकणंगले ) येथील कन्या विद्यामंदिर या मुलींच्या शाळेत कार्पोरेट शाळांनाही पाठीमागे टाकेल असे रोबोटिक लॅब. ई लर्निंग.या सह मूल्यवर्धन संस्कार लाठी काठी लेझीम व योगासन व कथक नृत्य प्रशिक्षण अशा अत्याधुनिक व पारंपारिक संस्कारक्षम शैक्षणिक सुविधामुळे प्राथमिक शाळा कात टाकत असल्याचा सुखद प्रवास सर्वसामान्य पालक वर्गांना आशादाई च म्हणावा लागेल.

किणी येथील जिल्हा परिषदेची कन्या विद्या मंदिर या मुलींच्या शाळेत गेल्या पाच वर्षापासून संगणक कक्ष सुरू आहे. तर यावर्षी जिल्हा नियोजन समितीकडून रोबोटिक लॅब चे साहित्य मिळाले असून विद्यार्थिनींना ई लर्निंग प्रोजेक्टर अशा कार्पोरेट शाळा सारखे अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य मिळाले असून जिल्हा परिषदेच्या शाळेतील ज्ञानदानाचा चेहरा मोहरा पूर्णता बदलल्याचे चित्र आहे. आणि विशेष म्हणजे टी ई टी पात्र उच्च शैक्षणिक अहर्ता असलेले शासनाकडून वेळोवेळी नव संकल्पनांचे प्रशिक्षण घेतलेले अध्यापक असा बदललेला लूक व साजेशी यंत्रणा ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनींना आधुनिक शिक्षण प्रणालीचे द्वार खुले होत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.
[: 1##जि. प. शाळेतील नाविन्यपूर्ण उप क्रमामध्ये डिजिटल शाळा ई लर्निंग द्वारे अध्यापन. व कृतीतून शिक्षण यासह स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. मुलीसाठी संस्कार शिबिराचे आयोजन तसेच योगा बरोबर मुलींना लाठी काठी सह लेझीम व मैदानी कवायत प्रकार कथ्थक नृत्य याचे धडे इथे दिले जातात

Advertisement

या शाळेच्या भिंती नुसत्या बोलक्याच नाहीत तर आकर्षक रंग संगती विद्यार्थिनींना सर्व भौतिक सुविधा 1960 मधील शाळेची इमारत परंतु डागडू जी करून सुसज्ज अशी आहे. यामुळेच जिल्हास्तरीय 5 स्टार मानांकन मिळाले आहे. 3## जिल्ह्यातील इतर शाळाप्रमाणेच इथेही मोफत पाठ्यपुस्तके.गणवेश. बूट सॉक्स. पोषण आहार. नियमित आरोग्य तपासणी अशा सर्व सुविधा मोफत राबवल्या जातात. शाळेच्या नावाचे युट्युब चॅनेल.कन्या विद्या मंदिर किणी. या चैनल वर शाळेने राबवलेले उपक्रम व सद्यस्थितीतील शालेय कामकाज जगासमोर आणले आहे. माझं गाव... माझी सुसंज्ज शाळा. योगदान देणाऱ्यामध्ये किणी चे सुपुत्र मंत्रालयात उपसचिव पदावर कार्यरत असलेले विक्रम सिंह यादव. संजय बी पाटील यांचे संजय पाटील फाउंडेशन. ऍड. एन आर पाटील यांचे श्री महावीर संस्था समूह. शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघटना. यांचेसह सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य. शालेय व्यवस्थापन समिती. आम्ही किणी करचे सदस्य यांचे सह गावातील सुज्ञ पालक व नागरिक यांचे योगदान लाभले

Advertisement
Tags :

.