महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत, चलिहा पराभूत

06:27 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कौलालंपूर

Advertisement

येथे सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या भारताच्या पीव्ही सिंधूने संघर्षपूर्ण विजय मिळवित उपांत्य फेरीत स्थान मिळविले. तिने चीनच्या अग्रमानांकित हान युईवर मात केली.

Advertisement

जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असणाऱ्या सिंधूने 55 मिनिटांच्या खेळात 21-13, 14-21, 21-12 अशी मात करीत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. गेल्या महिन्यात निंगबो येथे झालेल्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये हान युईने सिंधूला हरविले होते. त्या पराभवाची परतफेड तिने येथे केली. माजी वर्ल्ड चॅम्पियन असणाऱ्या सिंधूची उपांत्य लढत इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वारदानी किंवा थायलंडची बुसानन आँगबमरुंगफान यापैकी एकीशी होईल. सिंधूने 2022 मध्ये सिंगापूर ओपन ही शेवटची स्पर्धा जिंकली होती.

अन्य लढतीत अश्मिता चलिहाची विजयी घोडदौड उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आली. तिला चीनच्या सहाव्या मानांकित झँग यी मानने 21-10, 21-15 असे हरवित आगेकूच केली.

सिंधूने पहिल्या गेममध्ये 3-3 वरून 11-5 अशी ब्रेकवेळी आघाडी घेतली. युईने हळूहळू पकड मिळवित सिंधूची आघाडी 13-16 अशी कमी केली. पण सिंधूने नंतर सरळ पाच गुण घेत हा गेम जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर पडलेल्या युईने दुसऱ्या गेममध्ये जोरदार सुरुवात करीत 5-0 अशी आघाडी घेतली. हे वर्चस्व कायम राखत तिने सिंधूला झगडायला लावले. त्यामुळे तिने 15-2 अशी भक्कम आघाडी घेतली. सिंधूने मुसंडी मारत काही गुण मिळविले असले तरी युईने हा गेम आरामात जिंकून सामना तिसऱ्या गेमवर नेला. तिसऱ्या गेममध्ये सिंधूने हुशारीने खेळ करीत ब्रेकपर्यंत 11-3 अशी भक्कम आघाडी घेतली, जी निर्णायक ठरली. युईला ही पिछाडी भरून काढणे कठीण गेले आणि सिंधूने गेमसह सामना जिंकत आगेकूच केली.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article