For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'चकवा'ला सांस्कृतिक कलादर्पणची चार नामांकने

05:37 PM Mar 02, 2025 IST | Radhika Patil
 चकवा ला सांस्कृतिक कलादर्पणची चार नामांकने
Advertisement

 सातारा : 

Advertisement

डॉ. जवाहरलाल शाह यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पतर्फे लहान मुलांमध्ये जी व्यसनाधीनता बाढत आहे त्याविषयी समाजजागृतीच्या हेतूने चकवा हा लघुपट बनविला. या लघुपटाला सांस्कृतिक कलादर्पणची उत्कृष्ट लघुपट, उत्कृष्ट दिग्दर्शक बाळकृष्ण शिंदे, लेखक बाळकृष्ण शिंदे आणि राजीव मुळये तसेच उत्कृष्ट अभिनेता विजय निकम अशी चार नामांकने मिळाली आहेत.

या लघुपटाची संकल्पना जवाहरलाल शाह यांची असून याची कथा, संकलन आणि दिग्दर्शन बाळकृष्ण शिंदे यांचे आहे. पटकथा व संवाद राजीव मुळये, छायांकन बीरधवल पाटील, संगीत मंदार पाटील, ध्वनी आरेखन जतीन केंजळे, संकलन, ध्वनी संकलन स्थळ संगीत स्टुडीओ आणि निर्मिती प्रमुख म्हणून आनंद कदम यांनी काम पाहिलं. या लघुपटात जीशान आतार आणि विजय निकम यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. तसेच सारिका जाधव, राजीव मुळ्ये, नील केळकर, चैतन्य पाटेकर, प्रज्ञा चव्हाण, नीरज साहू, प्रथमेश देशपांडे, आदेश कुलकर्णी, ओम काळेकर, पुष्कर दळवी, आराध्य हेंद्रे, सृष्टी बोडके यांनी अभिनय केला आहे. मयुरेश देशपांडे, दत्ता क्षीरसागर, जमीर आतार, देवराज कामाठी, संतोष देशमुख आदी मंडळींनी तांत्रिक बाजू सांभाळल्या आहेत. अमित कुलकर्णी, यशवंत काटकर, रमेश काटकर, यशवंत पवार, संजय पवार, दिनेश पाटेकर या मंडळींनी या लघुपटासाठी मोलाचे सहकार्य केले.

Advertisement

सयाजी शिंदे, तुषार भद्रे, राजेंद्र मोहिते, प्रताप गंगावणे, नितीन दीक्षित, सचिन मोटे, मधु फल्ले, डॉ. निलेश माने, डॉ. मिलिंद सुर्वे, कुलदीप मोहिते, सागर मोहिते, अनुप जगदाळे, चंद्रकांत काबीरे, दीपक देशमुख, प्रसाद देवळेकर, रसिका केसकर, प्रसाद नारकर आदी मान्यवरांनी चकवा टीमच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Advertisement
Tags :

.