For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jyotiba Yatra | चांगभलं'च्या गजरात चैत्र यात्रेची सांगता; दख्खनच्या राजाचे रूप डोळ्यात साठवून भक्त परतीच्या वाटेवर

03:07 PM Apr 03, 2026 IST | NEETA POTDAR
jyotiba yatra   चांगभलं च्या गजरात चैत्र यात्रेची सांगता  दख्खनच्या राजाचे रूप डोळ्यात साठवून भक्त परतीच्या वाटेवर
Advertisement

      जोतिबाची राजेशाही रूपात सुवर्णालंकारीक खडी महापूजा

Advertisement

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजाश्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्री महायात्रेला दहा लाखांवर भाविकांनी हजेरी लावली, चैत्र बारीतील श्री जोतिबा देवाचे रूप डोळ्यात साठवत भक्तगण आता परतीच्या मार्गाला लागले आहेत.

'जोतिबाच्या नावानं चांगभलं...' च्या गजरात, चैत्र लगतचा गुरुवारी असंख्य भाविकांनी श्रीच्या दरबारात हजेरी लावून श्रींचे दर्शन घेतले. यावेळी भक्तांनी श्रीस धार्मिक विधीकरुन श्रीचरणी गुलाल, दवणा, हार, फुले, नारळ बाहिला. मंदिर परिसरात कालही काही सासनकाठ्या मंदिरात दाखल झाल्या होत्या. यावेळी भक्तांनी चांगभलच्या गजरात गुलाल, खोबरे, खारका उधळल्या. रुढी परंपरेनुसार जोतिबाच्या चैत्री यात्रेमध्ये हमखास पाऊस पडत असतो. बुधवारी यात्रेमध्येही बरुण राजा बरसला आणि काल गुरुवारीही जोतिबाबर बरुणराजा बरसला.दरम्यान, या जोतिबा देवाच्या यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याप्रमाणेच यंदाही लाखो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा निर्विघ्नपणे संपन्न झाली.

Advertisement

किवळ या गावांच्या मानाच्या सासनकाठ्या काल रात्री पालखी झाल्यानंतर धार्मिक विधी करून गावी जाण्यास निघाल्या. यावेळी गावातील मस्थ, पुजारी यांनी त्यांचे स्वागत केले. कासेगावच्या सासनकाठी भक्तांनी काल सासनकाठी मिरवणुकीत आम्ही पुजारी समर्थकच, असे बोर्ड वून मिरवणूक काढली होती. गुरुवारी पहाटे चार वाजता दख्खनच्या राजाच्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर पाद्यपुजा व काकड आरती करण्यात आली. सकाळी ८ वाजता जोतिबासह सर्व देवांना महाअभिषेक, महापोशाख व सुवर्णालंकारीक आकर्षक महापूजा बांधण्यात आली. त्यानंतर धुपारती करुन महानैवेद्य दाखविण्यात आला.

राजेशाही रूपात खडी महापूजा
दरम्यान, गुरुवार निमित्ताने जोतिबाची दख्खनच्या राजेशाही रुपातील आकर्षक खडी सुवर्णालंकरिक महापूजा बांधण्यात आली होती. ही महापूजा श्रीचे पुजारी संकेत उपारे, उत्तम भिवदर्णे, अक्षय ठाकरे, बाळासो सांगळे, गजानन उपारे, महालिंग शिंगे, सतिष उपारे राजाराम बनकर, नितिन लादे, महादेव झुगर, विकास ठाकरे यांनी बांधली.

Advertisement
Tags :

.