For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | चैतन्य मंगल कार्यालयातील 'त्या' चोरीचा छडा; पाहुणी बनून आली अन् ३ लाखांहून अधिकचे दागिने लंपास करून पुण्याला पळाली!

03:22 PM Jun 07, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   चैतन्य मंगल कार्यालयातील  त्या  चोरीचा छडा  पाहुणी बनून आली अन् ३ लाखांहून अधिकचे दागिने लंपास करून पुण्याला पळाली
Advertisement

नातेपुते- चैतन्य मंगल कार्यालयात विवाह समारंभादरम्यान घडलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा नातेपुते पोलिसांनी यशस्वीपणे उघडकीस आणला आहे. लग्न समारंभातील गोंधळ आणि गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या पुणे येथील महिला आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून ३ लाख २८ हजार ५७५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Advertisement

१४ मे २०२६ रोजी विवाह सोहळ्यातील गडबडीत फिर्यादी यांच्या कुटुंबातील महिलेच्या पर्समधूनसोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या घटनेनंतर नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि आधुनिक तांत्रिक साधनांच्या मदतीने संशयिताचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपी महिला लग्न समारंभातील महिलांच्या पर्सवर लक्ष ठेवून संधी साधत चोरी करत असल्याचे उघड झाले.

Advertisement

पोलिसांनी पुणे येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कडवे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली.

चैतन्य मंगल कार्यालयात विवाह समारंभादरम्यान घडलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा नातेपुते पोलिसांनी यशस्वीपणे उघडकीस आणला आहे. लग्न समारंभातील गोंधळ आणि गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या पुणे येथील महिला आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून ३ लाख २८ हजार ५७५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Tags :

.