For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंजनेयनगरात चेनस्नॅचिंगची घटना

06:45 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंजनेयनगरात चेनस्नॅचिंगची घटना
Advertisement

महिलेच्या मंगळसूत्राचे सात ग्रॅम सोने पळवले

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

चोऱ्या, घरफोड्यांपाठोपाठ चेनस्नॅचिंगच्या घटनाही सुरू झाल्या आहेत. अंजनेयनगर येथील एका वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन दोघा भामट्यांनी पलायन केल्याची घटना घडली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Advertisement

शुक्रवार दि. 25 सप्टेंबर रोजी पोलीस यंत्रणा श्री विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात असताना सायंकाळी भामट्यांनी डाव साधला आहे. सायंकाळी फिरण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या शीला कोडगन्नावर (वय 66) या वृद्धेच्या गळ्यातील 50 ग्रॅमच्या मंगळसूत्राला हिसडा मारला. यापैकी 7 ग्रॅमचा एक तुकडा भामट्याच्या हाती लागला आहे.

वृद्धेने आरडाओरड करताच लोक जमा झाले. त्याआधीच मोटरसायकलवरून आलेल्या भामट्यांनी तेथून पलायन केले होते. माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर, उपनिरीक्षक श्रीशैल हुलगेरी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.