हिरेबागेवाडीनजीक साखळी अपघात; पाच वाहनांचे नुकसान; एक जखम
11:13 AM May 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडी नजीकच्या बडेकोळ मठ क्रॉसवर रविवारी सायंकाळी साखळी अपघात झाले. या अपघातात तीन ट्रक व दोन कार अशा पाच वाहनांचे नुकसान झाले असून एक तरुण जखमी झाला आहे. रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ट्रक व कारमध्ये धडक होऊन हा साखळी अपघात झाला. इम्रान हुसेन (वय 19) राहणार तरीकेरे असे जखमी तरुणाचे नाव असून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Advertisement
Advertisement